मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: तारा तोडून सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये शिरले तरुण! कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

Salman Khan: तारा तोडून सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये शिरले तरुण! कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 08, 2024 11:07 AM IST

Salman Khan Panvel Farm House: दोन तरुणांनी सलमान खानच्या पनवेल स्थित फार्म हाऊसमध्ये अवैधरीत्या शिरण्याचा प्रयत्न केला आहे.

Salman Khan Panvel Farm House
Salman Khan Panvel Farm House (HT)

Salman Khan Panvel Farm House: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ वेळोवेळी पाहायला मिळत असते. आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक मिळवण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. दोन अज्ञात तरुणांनी सलमान खानच्या पनवेल स्थित फार्म हाऊसमध्ये अवैधरीत्या शिरण्याचा प्रयत्न केला आहे. सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या कुंपणाच्या तारा तोडून दोन तरुणांनी थेट सलमान खानच्या घरात शिरकाव केला होता. मात्र, या दोन्ही तरुणांना तिथल्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही तरुणांना पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी या तरुणांना अटक केली असून, त्यांच्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. पोलिसांच्या तपासात या तरुणांकडे बनावट आधारकार्ड सापडले आहेत. आता या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजेयप्रकाश गिल आणि गुरुसेवक सिंह अशी या तरुणांची नावे असून, दोघेही अवघ्या २३ वर्षांचे आहेत.

Lockdown Lagna: प्रवीण तरडे लावणार ‘लॉकडाऊन लग्न’; ‘या’ दिवशी रिलीज होणार नवाकोरा मराठी चित्रपट!

गुरुवारी म्हणजेच ४ जानेवारी रोजी सायंकाळी या दोन्ही तरुणांनी सलमान खानच्या अर्पिता फार्महाऊसच्या तारा तोडून आणि झाडांच्या कंपाऊंडमधून या तरुणांनी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते फार्महाऊसमध्ये शिरत असतानाच सुरक्षा रक्षकांचे लक्ष गेले, आणि त्यांना पकडण्यात आले. फार्महाऊसच्या सुरक्षा रक्षकांनी पकडताच या तरुणांनी आपली खोटी माहिती आणि खोटी नावं सांगितली. त्यांनी आपण उत्तर प्रदेशवरून आल्याचे म्हटले. मात्र, संशय आल्याने अधिकचा तपास केल्यावर आणि पोलिसांना बोलावल्यावर सत्य समोर आले.

पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी खरी माहिती सांगितली. त्यांनी आपले फोटो वापरून बनावट आधारकार्ड तयार करून घेतले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर या तरुणांनी आपण केवळ सलमान खानला भेटण्यासाठी हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग