Mitali Mayekar Viral Post: मराठी मनोरंजन विश्वातील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्रींच्या यादीत मिताली मयेकर हीचं नाव आवर्जून घेतलं जातं. अभिनेत्री मिताली मयेकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. तर, फॅशनच्या बाबतीतही मिताली अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर देताना पाहायला मिळते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री आपले बोल्ड फोटो शेअर करून नेहमीच चर्चेत असते. मिताली मयेकर ही अशी अभिनेत्री आहे, जी आपली मतं अतिशय स्पष्ट शब्दांत आणि बेधडकपणे मांडते. आता देखील तिने सोशल मीडियावर अशी एक बिनधास्त पोस्ट शेअर केली आहे, जी तुफान चर्चेत आली आहे.
नेहमीच बेधडक आणि स्पष्ट शब्दांत आपली मतं मांडणाऱ्या अभिनेत्री मिताली मयेकर हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने समस्त महिला वर्गाला एक प्रश्न केला आहे. तिने या स्टोरीच्या माध्यमातून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘ब्रा न घालणं आणि ओव्हरसाईज कपडे घालणं हा स्वतःची काळजी घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे.’ या पोस्टसोबतच तिने लिहिले की, ‘महिलांनो यावर बोला...’ मिताली मयेकरने ही पोस्ट तिच्या स्टोरीवर शेअर केल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. स्टोरी फिचरनुसार ही पोस्ट आता तिच्या अकाऊंटवर दिसत नसली तरी महिला चाहत्यांमध्ये आता या पोस्टची चांगलीच चर्चा आहे.
मिताली मयेकर हिने महिलांच्या अंतर्वस्त्रांसंबंधित केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा हा सल्ला महिला चाहत्यांना अगदीच खास आणि जवळचा वाटला आहे. महिलांच्या अंतर्वस्त्रांसंबंधित बिनधास्त पोस्ट करणारी मिताली मयेकर ही पहिली अभिनेत्री नाही. या आधी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील अशीच एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या पोस्टवर देखील समस्त चाहती वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला होता. आता मितालीच्या या पोस्टने देखील अशीच हाईप निर्माण केली आहे.
मिताली मयेकर हिने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. मराठी मालिका, चित्रपट, वेब सीरिज यांसह तिने अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मितालीने अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली असून, ही जोडी अनेकदा परदेशवारी करताना दिसते. आपल्या ट्रिपची झलक ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
संबंधित बातम्या