Lockdown Lagna: प्रवीण तरडे लावणार ‘लॉकडाऊन लग्न’; ‘या’ दिवशी रिलीज होणार नवाकोरा मराठी चित्रपट!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lockdown Lagna: प्रवीण तरडे लावणार ‘लॉकडाऊन लग्न’; ‘या’ दिवशी रिलीज होणार नवाकोरा मराठी चित्रपट!

Lockdown Lagna: प्रवीण तरडे लावणार ‘लॉकडाऊन लग्न’; ‘या’ दिवशी रिलीज होणार नवाकोरा मराठी चित्रपट!

Jan 08, 2024 10:31 AM IST

Lockdown Lagna Marathi Movie: प्रवीण तरडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

Lockdown Lagna Marathi Movie
Lockdown Lagna Marathi Movie

Lockdown Lagna Marathi Movie: आरारारा खतरनाक! म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा म्हणजे दिग्दर्शक-निर्माते-अभिनेते प्रवीण तरडे. त्यांचा चित्रपट म्हटला की बॉक्स ऑफिसवर एकच कल्ला असतो. आता प्रवीण तरडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन लग्न’ असं या नव्या आगामी चित्रपटाचं नाव असून, नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येत्या ८ मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तीन वर्षांपूर्वीचा महाभयंकर कोरोना काळ आणि त्यादरम्यान लागलेला लॉकडाऊन हा आजही सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट ‘लॉकडाऊन लग्न’ या आगामी मराठी चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाचं धमाकेदार पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेते प्रवीण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत असून, त्यांचा जबरदस्त अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. मात्र, या चित्रपटातील इतर कलाकरांची नावे अजुन गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत.

Mitali Mayekar Post: ‘नो ब्रा अँड ओव्हरसाईज क्लोथ्स...’; अभिनेत्री मिताली मयेकर नेमकं काय म्हणाली?

कोरोना काळ सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक असला, तरी या काळात अनेक गंमतीजमती देखील झाल्या होत्या. लग्न म्हटलं, की धमाल ही असतेच. त्यामुळे ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटातून लग्नाची गोष्ट कशा प्रकारे दाखवली जाणार, चित्रपटात कलाकार कोण आहेत, याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.

‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. पोस्टरवर असलेल्या मास्क, सँनिटायझर यावरून चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचे दिसून येते आहे.

Whats_app_banner