मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tiger 3 OTT: ठरलं! घरबसल्या ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सलमान खानचा ‘टायगर ३’

Tiger 3 OTT: ठरलं! घरबसल्या ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सलमान खानचा ‘टायगर ३’

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 06, 2024 01:23 PM IST

Tiger 3 OTT Release: सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट आता लवकरच घरबसल्या पाहायला मिळणार आहे. नुकतीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Tiger 3 OTT Release
Tiger 3 OTT Release

Tiger 3 OTT Release: बॉलिवूडचा दबंग खान अर्थात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट गत वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट आता लवकरच घरबसल्या पाहायला मिळणार आहे. नुकतीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सलमान खानचे चाहते देखील खूप आनंदी झाले आहेत.

‘टायगर ३’ या चित्रपटामध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. सलमान खानचा हा स्पाय थ्रिलर चित्रपट १२ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने ‘टायगर ३’ चित्रपटाच्या अधिकृत रिलीजची घोषणा केली आहे. ‘टायगर ३’ हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Pushkar Jog: ‘बिग बॉस मराठी’ फेम पुष्कर जोग सई लोकूरवर नाराज! म्हणाला ‘लग्नाला नाही बोलवलंस पण...’

‘टायगर ३’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने याची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. आता चाहते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची डेट जाहीर करण्याची वाट बघत आहेत.

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांचा 'टायगर ३' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. 'टायगर ३' हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाय टिकवून होता.

WhatsApp channel

विभाग