मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rishabh Pant Accident: उर्वशी रौतेलाच्या आईने लिहिली ऋषभ पंतसाठी पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Rishabh Pant Accident: उर्वशी रौतेलाच्या आईने लिहिली ऋषभ पंतसाठी पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 02, 2023 04:58 PM IST

Urvashi Rautela: ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट करत तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच उर्वशीच्या आईने देखील पोस्ट केली आहे.

ऋषभ पंत
ऋषभ पंत (HT)

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. दिल्लीहून घरी परतत असताना त्याची गाडी दुभाजकाला धडकल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये ऋषभला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसाठी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. त्यापाठोपाठ आता उर्वशीच्या आईने पंतसाठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवरुन अनेकांनी उर्वशीला ट्रोल केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उर्वशीची आई मीरा रौतेला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवकर ऋषभ पंतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी 'सोशल मीडियावरील अफवा एककीडे आणि आंतराष्ट्रीय स्थरावर उत्तराखंडचे नाव मोठे करणाऱ्या तू एकीकडे.. सिद्धबलिबाबा तुझ्यावर कृपा करो' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: मंदिरात जाऊन कंगना रणौतने केली नवीन वर्षाची सुरुवात, फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर उर्वशीच्या आईची पोस्ट चर्चेत असते. काही नेटकऱ्यांनी या पोस्टवरुन उर्वशीला सुनावले आहे. एका यूजरने 'आईकडून काही शिक' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'मॅडम तुम्ही तुमच्या मुलीला का शिकवत नाही काही' असे म्हटले आहे. नेटकऱ्यांनी उर्वशीवर चांगलाच निशाणा साधला आहे.

पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया आली होती. हा अपघात कसा घडला आणि तो कारमधून कसा बाहेर आला हे त्याने सांगितले आहे. जर पंतला गाडीतून बाहेर येण्यास थोडा उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. कारण या घटनेनंतर कारने पेट घेतला आणि गाडी जळून खाक झाली.

विंड स्क्रीन तोडून पंत बाहेर आला

ऋषभ पंतने सांगितले की, तो स्वतः कार चालवत होता. गाडी चालवताना त्याला डुलकी लागली. यामुळेच कार दुभाजकावर आदळली आणि मोठा अपघात झाला. अपघातानंतर तो विंड स्क्रीन तोडून बाहेर पडल्याचे त्याने सांगितले.

IPL_Entry_Point