मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranut: मंदिरात जाऊन कंगना रणौतने केली नवीन वर्षाची सुरुवात, फोटो व्हायरल

Kangana Ranut: मंदिरात जाऊन कंगना रणौतने केली नवीन वर्षाची सुरुवात, फोटो व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 01, 2023 06:37 PM IST

Kangana Ranaut New Year Pic: कंगनाने नवीन वर्षाची सुरुवात ही मंदिरात जाऊन दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेत आहे.

कंगना रणौत
कंगना रणौत (HT)

दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलिवूड कलाकारांनी नवीन वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात केली. कही कलाकारांनी परदेशात जाऊन नवीन वर्षाचे स्वागत केले तर काहींनी मुंबईत एकत्र येऊन पार्टी केली. आता अभिनेत्री कंगना रणौतने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंदिरातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कंगनाने लाल रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. या आउटफिटवर तिने ज्वेलरी घातली आहे. तसेच कपाळाला टिकली लावली आहे. कंगनासोबत फोटोमध्ये पूजारी पण दिसत आहे. कंगनाच्या हातात पूजेचे ताट दिसत आहे. हा फोटो शेअर करत कंगनाने 'नवीन वर्षाच्या शुभेच्छा' असे म्हटले आहे.
वाचा: मकरंद अनासपुरे यांचे मालिकाविश्वात पुनरागमन, दिसणार 'या' मालिकेत

कंगना रणौत
कंगना रणौत (HT)

कंगनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर मे २०२२मध्ये तिचा 'धाकड' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. चित्रपटाचे बजेट ८५ कोटी रुपये होते. मात्र, चित्रपटाने २.५ कोटींची देखील कमाई केली नाही. आता कंगनाचा 'इमर्जंसी' हा चित्रपट येणार आहे. या चित्रटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग