मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Rautel: ऋषभ पंतचा उल्लेख होताच उर्वशीने बदलले फोटोचे कॅप्शन, जाणून घ्या काय होती पोस्ट?

Urvashi Rautel: ऋषभ पंतचा उल्लेख होताच उर्वशीने बदलले फोटोचे कॅप्शन, जाणून घ्या काय होती पोस्ट?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 21, 2023 02:35 PM IST

Urvashi Rautel: उर्वशीने मुंबईत झालेल्या आयपीएल सामन्यातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटमुळे तिने कॅप्शन बदलल्याचे म्हटले जात आहे.

Urvashi Rautel
Urvashi Rautel

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिने जिंकलेल्या किताबामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. गेल्या काही दिवसांपासून उर्वशीचे नाव हे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडले जात आहे. मात्र अद्याप यावर दोघांनीही उघडपणे बोललेले नाही. आता उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पण काही वेळातच तिने पोस्टचे कॅप्शन बदलले.

ट्रेंडिंग न्यूज

उर्वशी नुकतीच मुंबईतील अरुण जेटली स्टेडियममधील आयपीएल सामना पाहण्यासाठी गेली होती. तेथील फोटो उर्वशीने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने, 'घायाळ मनाला पुन्हा फुलण्यासाठी आणि पुन्हा विश्वास ठेवण्यासाठी वेळ लागतो' या आशयाचे कॅप्शन दिले होते. मात्र, काही वेळाताच अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत क्रिकेटपटू ऋषभ पंतचा उल्लेख केला. त्यानंतर लगेच उर्वशीने कॅप्शन बदलले.
वाचा: 'तारक मेहता'च्या निर्मात्यांविरोधात शैलेश लोढाने पोलिसात केली तक्रार, काय आहे प्रकरण?

Urvashi Rautel post
Urvashi Rautel post

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी आणि ऋषभ हे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. उर्वशीने सोशल मीडियावर अनेकदा केलेल्या पोस्टमध्ये आरपीचा उल्लेख केला होता. त्यामुळे अनेकांना त्यांच्या रिलेशनबाबत कल्पना होती. पण त्यांनी कधीही उघडपणे यावर प्रतिक्रिया दिली नाही.

उर्वशीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच हॉलिवूड चित्रपटात जलवा दाखवताना दिसणार आहे. ती अभिनेता मिशेल मोरोनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासोबतच ती दाक्षिणात्य चित्रपट राम पोथिनेनीमध्ये काम करणार आहे. बॉलिवूडमध्ये तिचा इंस्पेक्टर अविनाश हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. तसेच ब्लॅक रोज या थ्रिलर चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग