मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: 'तारक मेहता'च्या निर्मात्यांविरोधात शैलेश लोढाने पोलिसात केली तक्रार, काय आहे प्रकरण?

TMKOC: 'तारक मेहता'च्या निर्मात्यांविरोधात शैलेश लोढाने पोलिसात केली तक्रार, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 20, 2023 04:29 PM IST

Taarak Mehta ka Oolta Chashma: अभिनेता शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा
तारक मेहता का उल्टा चष्मा

गेली १५ वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणारा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कलाकारांनी या शोला रामराम केला आहे. मात्र, मालिका सोडलेल्या कलाकारांना त्यांचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शैलेश लोढा यांनी आता निर्मात्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शैलेश लोढा यांनी मालिका सोडली. मालिका सोडून एक वर्ष उलटले असले तरी त्यांना निर्मात्यांनी पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी कायदेशिर कारवाई केली आहे. शैलेश यांच्याशी हिंदुस्तान टाइम्सने संपर्क साधला. त्यावेळी यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 'सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही' असे शैलेश लोढा म्हणाले आहेत.
वाचा: ऋषभ पंत नाही तर 'या' क्रिकेटपटूने उर्वशीला म्हटले सेक्सी अभिनेत्री

यापूर्वी एका मुलाखतीमध्ये मालिकेचे निर्माते असित मोदी यांना कलाकारांच्या पैशांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘आम्ही कलाकारांना पैसे दिले नाहीत, असे जे म्हटले जात आहे, ते अतिशय चुकीचे आहे. एखाद्याच्या मेहनतीचे पैसे घेऊन मी काय करू? देवाच्या दयेने माझ्याकडे सगळं काही आहे. लोकांचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे. मी लोकांना पैसे दिले नाहीत, असं काहीही नाही.’

IPL_Entry_Point