मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Rautela: ऋषभ पंत नाही तर 'या' क्रिकेटपटूने उर्वशीला म्हटले सेक्सी अभिनेत्री

Urvashi Rautela: ऋषभ पंत नाही तर 'या' क्रिकेटपटूने उर्वशीला म्हटले सेक्सी अभिनेत्री

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 19, 2023 08:42 AM IST

Urvashi Rautela: एका भारतीय क्रिकेटपटूने मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील सेक्सी अभिनेत्री म्हणून उर्वशीचा उल्लेख केला आहे.

Urvashi
Urvashi

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिने जिंकलेल्या किताबामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. गेल्या काही दिवसांपासून उर्वशीचे नाव हे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडले जात आहे. मात्र अद्याप यावर दोघांनीही उघडपणे बोललेले नाही. आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने उर्वशीला सेक्सी अभिनेत्री म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उर्वशीला सेक्सी म्हणणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून रविंद्र जडेजा आहे. रविंद्र जडेजाने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला 'बॉलिवूडमधील कोणती अभिनेत्री तुला सेक्सी वाटते' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने उर्वशी रौतेलाचे नाव घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर रविंद्र जडेजाने दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.
वाचा: IPLमधील ऋषभ पंतशी संबंधीत पोस्टर शेअर करत संतापली उर्वशी रौतेला

उर्वशीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच हॉलिवूड चित्रपटात जलवा दाखवताना दिसणार आहे. ती अभिनेता मिशेल मोरोनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासोबतच ती दाक्षिणात्य चित्रपट राम पोथिनेनीमध्ये काम करणार आहे. बॉलिवूडमध्ये तिचा इंस्पेक्टर अविनाश हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. तसेच ब्लॅक रोज या थ्रिलर चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग