मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Rautela: IPLमधील ऋषभ पंतशी संबंधीत पोस्टर शेअर करत संतापली उर्वशी रौतेला

Urvashi Rautela: IPLमधील ऋषभ पंतशी संबंधीत पोस्टर शेअर करत संतापली उर्वशी रौतेला

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 06, 2023 03:56 PM IST

Rishab Pant: उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर IPL सामना पाहण्यासाठी आलेल्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने संताप व्यक्त केला होता.

उर्वशी
उर्वशी (HT)

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे जवळचे नाते आहे. अनेक अभिनेत्रींनी भारतीय संघातील क्रिकेटपटूंशी लग्न केले आहेत. तर काहींच्या अफेअरच्या चर्चा कायम होत्या. आता अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादाविषयी तुम्हाला काही वेगळे सांगायला नको. त्यांच्यामध्ये सुरु असलेली नोकझोक ही जगजाहीर आहे. आता आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सबरोबरच्या सामन्यात ऋषभ त्याची टीम दिल्ली कॅपिटल्सला प्रोत्साहन करताना दिसून आला. त्यावेळी एक पोस्टर उभे घेऊन असलेल्या मुलीचा फोटो उर्वशीने शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका मुलीचा हातात पोस्टर असलेला फोटो शेअर केला आहे. या पोस्टवर “थँक गॉड, उर्वशी इथे नाहीये” असे लिहिलेले आहे. हे पोस्ट शेअर करत उर्वशीने त्या मुलीला 'का?' असा प्रश्न विचारला आहे.

उर्वशीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. “ऋषभला नजर लागली असती,” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “रौतेला असं तिने लिहिलेलं नाही, त्यामुळे इग्नोर कर,” अशी कमेंटही केली आहे.

ऋषभ कार अपघातात जखमी झाला होता

डिसेंबर २०२२ मध्ये ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. तो यात गंभीर जखमी झाल्यामुळे क्रिकेटच्या मैदानाबाहेर आहे. पंतच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया करावी लागली, त्यानंतर त्याने आता क्रॅचच्या मदतीने चालणे सुरू केले आहे. मात्र, त्याच्या परतण्याबाबतची परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. दिल्ली कॅपिटल्स संघाने या आयपीएल हंगामासाठी ऋषभ पंतच्या जागी युवा यष्टीरक्षक अभिषेक पोरेलला संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL_Entry_Point