मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा रामदास स्वामींनी लिहिली; अभिनेते योगेश सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा रामदास स्वामींनी लिहिली; अभिनेते योगेश सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 10, 2023 08:44 AM IST

The Kerala Story controversy: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असताना आता अभिनेते योगेश सोमण यांनी मात्र ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिल्याचे म्हटले आहे.

Yogesh Soman
Yogesh Soman

The Kerala Story controversy: सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात मोठा वादंग सुरू झाला आहे. काहींनी या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे, तर काहींनी मात्र या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यातील महिलांची प्रतिमा बिघडवत असल्याचेही अनेकांनी म्हटलं आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल यासारख्या ठिकाणी या चित्रपटावर बंदी देखील घालण्यात आली आहे. आता याच चित्रपटावर मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते योगेश सोमण यांनी देखील वक्तव्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असताना आता अभिनेते योगेश सोमण यांनी मात्र ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर, रामदास स्वामी यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची कथा शेकडो वर्षांपूर्वी एका ओळीत लिहून ठेवली आहे, असं योगेश सोमण म्हणाले आहेत. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे.

Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट अडचणीत; आसाराम बापू ट्रस्टकडून कायदेशीर नोटीस! नेमकं प्रकरण काय?

या व्हिडीओमध्ये अभिनेते योगेश सोमण म्हणाले की, ‘दोन दिवसांपूर्वी द केरळ स्टोरी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमातून या चित्रपटावरून गदारोळ झाला. काहीजणांनी या चित्रपटाचं गांभीर्य लोकांना सांगितलं. तर, काहीजणांनी चित्रपटाची सत्य आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले. पण अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ मधील चार ओळी आल्या आहेत. मी तर म्हणतो, ‘द केरळ स्टोरी’ची वन लाइन शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे.’ ‘किती गुजरीणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शांबूखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होवोनि मेल्या’, हा श्लोक त्यांनी यावेळी म्हटला.

यानंतर त्यांनी या ओळीचा अर्थ देखील समजावून सांगितला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चर्चेत आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग