मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट अडचणीत; आसाराम बापू ट्रस्टकडून कायदेशीर नोटीस! नेमकं प्रकरण काय?

Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट अडचणीत; आसाराम बापू ट्रस्टकडून कायदेशीर नोटीस! नेमकं प्रकरण काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 10, 2023 08:05 AM IST

Legal Notice to Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित होताच हा चित्रपट वादात अडकला आहे.

Sirf Ek Bandaa Kaafi Hai
Sirf Ek Bandaa Kaafi Hai

Legal Notice to Sirf Ek Bandaa Kaafi Hai: अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित होताच हा चित्रपट वादात अडकला आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. आसाराम बापू चॅरिटेबल ट्रस्टने ही नोटीस पाठवली असून, त्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.

अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित, 'सिर्फ एक बंदा कोफी है' या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीने पीसी सोलंकीची भूमिका केली आहे, ज्यांनी अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, एका अध्यात्मिक गुरुवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे आणि त्याला पोक्सो कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर मनोज बाजपेयीने साकारलेले पात्र, कोर्टात या मुलीसाठी लढतो आणि प्रक्रियेत त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट २३ मे रोजी झी ५वर रिलीज होणार आहे.

Chandrika Saha: १५ महिन्यांच्या बाळाला अभिनेत्रीच्या पतीने जमिनीवर आपटलं; CCTV फुटेजमधून धक्कादायक घटना आली समोर

अधिवक्ता सत्य प्रकाश शर्मा यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलेय की, अशा अध्यात्मिक गुरुसाठी रावण आणि बलात्कारी असे शब्द वापरण्यात आले आहेत, जे त्यांच्या धार्मिक चारित्र्याचा अपमान करणारे आहेत. या चित्रपटाच्या रिलीजमुळे माझ्या अशिलाची देशात आणि परदेशात प्रतिमा खराब होईल, ज्यामुळे त्यांच्या अनुयायी आणि समर्थकांना राग येईल. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.

या शिक्षेविरोधातील अपील राजस्थान उच्च न्यायालयात प्रलंबित असून, या चित्रपटामुळे माझ्या अशिलाच्या गोपनीयतेवर परिणाम होऊ शकतो, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. आसाराम बापू बलात्कार प्रकरणात जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले की, आमची कायदेशीर टीम याला उत्तर देईल. आम्ही अॅडव्होकेट पी सी सोलंकी यांच्या बायोपिकचे हक्क विकत घेतले आहेत. हा त्यांचा बायोपिक चित्रपट आहे.

IPL_Entry_Point

विभाग