मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chandrika Saha: १५ महिन्यांच्या बाळाला अभिनेत्रीच्या पतीने जमिनीवर आपटलं; CCTV फुटेजमधून धक्कादायक घटना आली समोर

Chandrika Saha: १५ महिन्यांच्या बाळाला अभिनेत्रीच्या पतीने जमिनीवर आपटलं; CCTV फुटेजमधून धक्कादायक घटना आली समोर

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 10, 2023 07:40 AM IST

Actress Chandrika Saha: चंद्रिका साहा हिच्या पतीने त्यांच्या अवघ्या १५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून बेदम मारहाण केली आहे.

Actress Chandrika Saha
Actress Chandrika Saha

Actress Chandrika Saha: ‘सीआयडी’, ‘सावधान इंडिया’ आणि ‘सपने सुहाने लडकपन के’यांसारख्या टीव्ही शोमध्ये झळकलेली अभिनेत्री चंद्रिका साहा हिने तिच्या पतीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. चंद्रिका साहा हिच्या पतीने त्यांच्या अवघ्या १५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून बेदम मारहाण केली आहे. या घटनेत लहान बाळाला गंभीर जखमा झाल्या आहेत. आय चंद्रिकाच्या तक्रारीवरून मुंबईतील बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चंद्रिका साहाने पोलिसांना सांगितले की, तिचा पती अमन मिश्रा स्वतःच्याच मुलाला आपलसं करत नव्हता. ३१ वर्षीय चंद्रिका म्हणाली की, याआधी तिचा एकदा घटस्फोट झाला होता. नंतर तिची भेट २१ वर्षीय अमन मिश्रासोबत झाली. २०२०मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र, या प्रेमप्रकरणात चंद्रिका गरोदर राहिल्यानंतर अमनने गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाब टाकला. परंतु, डॉक्टरांनी गर्भपात न करण्याचा सल्ला दिल्यामुळे, त्यांचे बाळ जन्माला आले. मात्र, हिच गोष्ट त्याला खटकली होती.

Rang Maza Vegla: अखेर दीपा कार्तिकला शिकवणार धडा; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार ट्विस्ट!

पोलिसांना माहिती देताना चंद्रिका म्हणाली की, यामुळे तिचा नवरा नेहमी रागावायचा आणि भांडण करायचा. गेल्या महिन्यात त्यांचा मुलगा १४ महिन्यांचा झाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाच्या महिनाभरानंतरच अमनचा खरा चेहरा समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती घरात स्वयंपाकघरात काम करत असताना तिला तिच्या मुलाचा रडण्याचा आवाज आला. यानंतर तिने अमनला बाळाकडे लक्ष देण्यास सांगितले. अमन बाळाला बेडरूममध्ये घेऊन गेला. पण, काही वेळाने चंद्रिकाला पुन्हा मोठ्याने बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ती खोलीत पोहोचली तेव्हा तिचा मुलगा जमिनीवर पडला होता.

यानंतर चंद्रिका आपल्या मुलाला घेऊन तत्काळ जवळच्या रुग्णालयात पोहोचली होती. सध्या त्यांच्या मुलाची प्रकृती ठीक आहे. यानंतर तिने सीसीटीव्ही फुटेज पाहिले. यात तिच्या पतीने चिमुरड्यावर केलेला क्रूरपणा स्पष्ट दिसत होता. या फुटेजमध्ये पती मुलाला जमिनीवर आपटताना दिसला आहे. चंद्रिका साहा हेच सीसीटीव्ही फुटेज घेऊन पोलिसांत गेली आणि गुन्हा दाखल केला.

IPL_Entry_Point

विभाग