मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, कमावले इतके कोटी

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, कमावले इतके कोटी

Aarti Vilas Borade HT Marathi
May 14, 2023 09:02 AM IST

The Kerala Story Box Office Collection: द केरळ स्टोरी हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासून चर्चेत आहे. आता प्रदर्शनाच्या ९व्या दिवशी चित्रपट तुफान कमाई करत असल्याचे दिसत आहे.

The Kerala Story Box Office Collection
The Kerala Story Box Office Collection

चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नऊ दिवस झाले. मात्र, चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप थांबलेला नाही. चित्रपटावरुन सुरु असलेला वाद एका बाजूला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत असलेली कमाई एका बाजूला. चित्रपटाने नऊ दिवसात बजेटच्या दुप्पट कमाई केल्याचे समोर आले आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची आता पर्यंतची कमाई...

ट्रेंडिंग न्यूज

नव्या दिवशी द केरळ स्टोरी हा सिनेमा १०० कोटी रुपये कमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये जाऊन बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ९व्या दिवशी चित्रपटाने १९.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता पर्यंत चित्रपटाने ११२.८७ कोटी रुपये कमावले आहेत.
वाचा: 'द केरळ स्टोरी'चा जगभरात डंका, परदेशातील शो हाऊसफूल

पहिला दिवस- ८.०३ कोटी

दुसरा दिवस- ११.२२ कोटी

तिसरा दिवस- १६.४० कोटी

चौथा दिवस- १०.०७ कोटी

पाचवा दिवस- ११.१४ कोटी

सहावा दिवस- १२ कोटी

सातवा दिवस- १२.५० कोटी

आठवा दिवस- १२ कोटी

नववा दिवस- १९.५० कोटी

‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. या चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये आहे. आता चित्रपट लवकरच १०० कोटी रुपयांच्या क्लब हाऊसमध्ये पोहोचणार असल्याचे म्हटले जात आहे.

IPL_Entry_Point