मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विमानातील भांडण केवळ पब्लिसिटी स्टंट!; कपिल शर्मासोबतच्या वादावर सुनील ग्रोव्हर नेमकं काय म्हणाला?

विमानातील भांडण केवळ पब्लिसिटी स्टंट!; कपिल शर्मासोबतच्या वादावर सुनील ग्रोव्हर नेमकं काय म्हणाला?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 29, 2024 10:40 AM IST

सुनील ग्रोव्हरने ७ वर्षांनंतर कपिलसोबतच्या भांडणावर मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मासोबतचं भांडण आठवून त्याची खिल्ली उडवली आहे.

विमानातील भांडण केवळ पब्लिसिटी स्टंट!; कपिल शर्मासोबतच्या वादावर सुनील ग्रोव्हर नेमकं काय म्हणाला?
विमानातील भांडण केवळ पब्लिसिटी स्टंट!; कपिल शर्मासोबतच्या वादावर सुनील ग्रोव्हर नेमकं काय म्हणाला?

'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मधून सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा बऱ्याच दिवसांनी एकत्र पुनरागमन करणार आहेत. या शोचा प्रोमोही रिलीज झाला आहे. अनेक वर्षांनंतर दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. या निमित्ताने सुनील ग्रोव्हरने ७ वर्षांनंतर कपिलसोबतच्या भांडणावर मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मासोबतचं भांडण आठवून त्याची खिल्ली उडवली आहे. यावर बोलताना सुनील ग्रोव्हर म्हटले की, हे त्यांचे इतक्या वर्षांचे प्लानिंग होते.

या भांडणाबद्दल बोलताना सुनील ग्रोव्हर म्हणाला की, 'आम्ही फ्लाइटमध्ये बसलो होतो आणि आम्हाला कळले की, नेटफ्लिक्स आता भारतात मोठा बिझनेस घेऊन येत आहे. त्यामुळे आता एखादा चांगला पब्लिसिटी स्टंट करावा लागेल, असं आम्हाला वाटलं. यानंतर आम्हा दोघांच्याही मनात हा भांडणाचा विचार आला. सहा वर्षांपूर्वी आमच्या फ्लाइटमध्ये जे काही घडले, ते या शोच्या पीआर स्टंटसाठी होते. जेणेकरून आम्हाला इतक्या मोठ्या व्यासपीठावर शो करण्याची संधी मिळेल.’

ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय! बच्चन कुटुंबच नाही तर देशही सोडणार; लेकीला घेऊन परदेशी स्थायिक होणार?

इतकी वर्ष काम का केलं नाही?

यानंतर सुनील ग्रोव्हरने सांगितले की, ‘जेव्हा नेटफ्लिक्सने त्याला विचारले की, तो या शोसाठी काय करू शकतो, तेव्हा त्याला भांडण्याची कल्पना आली.’ तर, कपिल शर्मा म्हणाला की, ‘सुनील ग्रोव्हरकडे त्यावेळी अनेक प्रोजेक्ट्स होते. तो अनेक मालिका आणि प्रोजेक्ट करत होता, त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकलो नाही.’ तर, सुनील ग्रोव्हर म्हणाला की, कपिल शर्मा आणि संपूर्ण टीमसोबत काम करताना खूप मजा येत आहे.

आता नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. हा शो टीव्हीवर नाही, तर ओटीटीवर रिलीज होणार आहे. या शोमध्ये कपूर कुटुंब पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ज्यात रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा हे कलाकार दिसणार आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा कॉमेडी शो ३० मार्चपासून दर शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होईल.

गोविंदाने आजवर संस्कृतीचे किती भान ठेवले?; कटू अनुभव शेअर करत मराठी निर्मात्याचा आरोपांचा भडीमार

कधी झाली होती पहिली भेट?

नुकत्याच एका मुलाखतीत कपिल शर्मानेही सुनील ग्रोव्हरबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. कपिल आणि सुनीलने आपले सर्व जुने मतभेद विसरून पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला आहे. कपिल सुनीलबद्दल बोलताना म्हणाला की, 'तुम्ही सर्वजण सुनील पाजीवर खूप प्रेम करता. लोकांना वाटतं की आमची जोडी २०१३मध्ये शोपासून बनली होती. पण, तसं नाहीये. २००९मध्ये ‘हंस बलिये’ नावाचा शो आला होता आणि त्या शोमध्ये आमची पहिली भेट झाली होती. संपूर्ण शो एका बाजूला, त्याचं फॅन फॉलोइंग एका बाजूला.. इतका तो लोकप्रिय आहे.’

WhatsApp channel

विभाग