Tharla Tar Mag: प्रियाचा खोटेपणा अर्जुन सिद्ध करू शकेल का? आश्रमच्या केसला मिळणार नवं वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharla Tar Mag: प्रियाचा खोटेपणा अर्जुन सिद्ध करू शकेल का? आश्रमच्या केसला मिळणार नवं वळण

Tharla Tar Mag: प्रियाचा खोटेपणा अर्जुन सिद्ध करू शकेल का? आश्रमच्या केसला मिळणार नवं वळण

Sep 13, 2023 12:00 PM IST

Tharla Tar Mag 12 September 2023: अर्जुन आश्रमाच्या केसचा छडा लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार आहे. यातून प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर येणार आहे.

Tharla Tar Mag 12 September 2023
Tharla Tar Mag 12 September 2023

Tharla Tar Mag 12 September 2023: ठरलं तर मग’ मालिकेत आता खुनाच्या केसचा उलगडा होताना दिसणार आहे. सायलीची केस सोडवण्यासाठी आता अर्जुन कंबर कसणार आहे. मधुभाऊंना न्याय मिळवून देण्यासाठी अर्जुन प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. आता अर्जुन या केसचा छडा लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार आहे. यातून प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर येणार आहे. आश्रमात झालेला खून आणि प्रिया सानाग्त असलेली कथा यात जमीन आस्मानीची तफावत असल्याचे आता सगळ्यांसमोर येणार आहे.

सायली ही एक अनाथ मुलगी असून, ती एका आश्रमात लहानाची मोठी झाली होती. त्यांच्या या आश्रमात विसाव्याला असणाऱ्या मुलांचा सांभाळ करणारे मधुभाऊ तिथल्या सगळ्याच मुलांचे वडील झाले होते. मात्र, त्यांनी सुरू केलेल्या या आश्रमाच्या जमिनीवर काही वाईट लोकांची नजर पडली. आश्रमाची जमीन मिळवून त्याजागी आलिशान इमारत बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्यांनी ही जमीन मिळवण्यासाठी रचलेल्या कटात विलास नावाच्या एका व्यक्तीचा खून झाला होता. आश्रमात झालेल्या या खुनाचा सगळा संशय आणी आरोप मधुभाऊ यांच्या माथी मारण्यात आला.

Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘स्वराज’ मुलगा नव्हे मुलगी! मल्हारला कळेल का आपल्याला लेक असल्याचं सत्य?

या आरोपात मधुभाऊ यांना पोलीसांनी अटक केली होती. या खोट्या आरोपातून आणि तुरुंगातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सायलीने अर्जुनची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच सायली आणि अर्जुन यांचं लग्न देखील झालं होतं. त्यानंतर अर्जुनने पूर्णपणे या केसची धुरा स्वतःच्या हातात घेतली आहे. आता मधुभाऊ यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः अर्जुन अनेक प्रयत्न करणार आहे. या केसची सुनावणी होत असताना प्रियाने अनेक गोष्टी रचून सांगितल्याचे लक्षात येताच अर्जुनने कोर्टाकडे या घटनेची नाट्यमय पुनरावृत्ती करण्याची परवानगी मागितली होती.

कोर्टाने अर्जुनची ही मागणी मान्य केली असून, आता ही घटना पुन्हा एकदा घडताना दिसणार आहे. यावरून काही गोष्टी रचून त्या कोर्टासमोर सादर करून मधुभाऊंना यात गुंतवले जात असल्याचे समोर येणार आहे. प्रियाने सांगितलेल्या तपशीलावरून ही घटना पुन्हा एकदा घडवून आणली जाणार आहे. त्यात या सगळ्या त्रुटी दिसून येणार आहे. यामुळे प्रिया खोटं बोलत असल्याचे सगळ्यांसमोर येणार आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या येत्या भागांमध्ये हा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner