मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: ते सगळे आरोप खोटे, उलट तीच...; जेनिफर मिस्त्रीच्या आरोपांवर ‘तारक मेहता’चा निर्माता भडकला!

TMKOC: ते सगळे आरोप खोटे, उलट तीच...; जेनिफर मिस्त्रीच्या आरोपांवर ‘तारक मेहता’चा निर्माता भडकला!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 12, 2023 12:00 PM IST

Asit Kumar Modi reacted on allegations: ‘तारक मेहता..’चे निर्माते असित कुमार मोदी यांनी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Asit Kumar Modi reacted on allegations
Asit Kumar Modi reacted on allegations

Asit Kumar Modi reacted on allegations:तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका पुन्हा एकदा वादात अडकली आहे. या मालिकेत ‘रोशन सोढी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री-बन्सीवाल हिने मालिका सोडण्याबरोबरच शोचे निर्माते असित कुमार मोदी आणि क्रू मेंबर्सवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता मालिकेच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. ‘तारक मेहता..’चे निर्माते असित कुमार मोदी यांनी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

निर्माते असित कुमार मोदी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘हा फक्त खोटा आणि बिनबुडाचा आरोप आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती फक्त माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. मी ते आरोप कधीच स्वीकारणार नाही. मी माझ्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. आम्हीच तिला शोमधून काढून टाकले आहे. मी आणि माझ्या टीमने तिला हा सोडण्यास सांगितले आहे. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. माझे प्रॉडक्शन लवकरच सर्व पुरावे आणि कागदपत्रे तुम्हा सर्वांना पाठवेल. खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून ती शो आणि माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याने, आम्ही तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू.’

Dahaad Review: ओटीटीवरही दिसली सोनाक्षी सिन्हाची ‘दबंग’गिरी! वाचा कशी आहे ‘दहाड’ वेब सीरिज...

प्रॉडक्शन हाऊस ‘नीला टेलिफिल्म्स’ टीमने जेनिफर मिस्त्रीबद्दल जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ती सेटवर अजिबातच नीट वागत नव्हती. ती तिच्या कामाकडे लक्ष देत नव्हती. तिच्या वागणुकीमुळे आमच्याकडे रोज प्रॉडक्शन हेडकडे तक्रार यायची. इतकंच नाही तर, शेवटच्या दिवशी तिने संपूर्ण युनिटसमोर खूप तमाशा केला. शूटिंग देखील पूर्ण केली नाही आणि सेटवर सगळ्यांना शिवीगाळ केली.’

यात पुढे लिहिण्यात आले आहे की, ‘तिने शोमधील संपूर्ण टीमसोबत नेहमीच गैरवर्तन केले. शूटमधून बाहेर पडताना तिने तिची कार भरधाव वेगाने चालवली आणि तिच्या मार्गात येणाऱ्या लोकांना टक्कर दिली. इतकंच नाही तर, तिने सेट वरच्या मालमत्तेचंही नुकसान केलं आहे. शूटिंगच्या वेळी त्याच्या वाईट वागणुकीमुळे आम्हाला तिचा करार रद्द करावा लागला. या घटनेच्या वेळी असित मोदी अमेरिकेत होते. आता ती आमच्यावर बिनबुडाचे आरोप करून शोची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. या बिनबुडाच्या आरोपांविरोधात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे.’

IPL_Entry_Point