Swara Bhasker: ‘हा तर बलात्काऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न...’; कुस्तीपटूंच्या समर्थनात स्वरा भास्करची पोस्ट!
Swara Bhasker Tweet: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने पाठिंबा दिला आहे.
Swara Bhasker Tweet: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने पाठिंबा दिला आहे. या दरम्यान स्वर भास्करने एक ट्वीट केले आहे, जे आता तुफान व्हायरल होत आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करावी, अशी मागणी कुस्तीपटू सातत्याने करत आहेत. मंगळवारी (३० मे) साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी एक निवेदन जारी करत, आपण देशासाठी मिळवलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला जात आहोत, असे म्हटले होते. शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्याठिकाणी धाव घेत कुस्तीपटूंना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रचंड गदारोळ सुरू होता. आता अभिनेत्री स्वरा भास्करने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणा ब्रिजभूषण शरण सिंह यांना वाचवत असल्याचे तिने म्हटले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
Adipurush: प्रदर्शनाआधीच ‘आदिपुरुष’ गाठणार ५०० कोटींचा टप्पा! इतकी कमाई नेमकी कशी झाली? वाचा..
कुस्तीपटूंच्या निर्णयाची माहिती देताना एएनआयने एक ट्विट केले होते की, 'कुस्तीपटूंनी म्हटले आहे की, ते हरिद्वारला गंगेत पदके विसर्जित करण्यासाठी जात आहेत'. या ट्विटवर स्वराने लिहिले की, 'आमचे सरकारची मर्यादा तरी बघा... मला या सगळ्याचं आश्चर्य वाटत आहे. तपास यंत्रणा बलात्काराच्या आरोपीला वाचवत आहेत. हे खूप लज्जास्पद आहे.’ तर, साक्षी मलिकचे वक्तव्य शेअर करत स्वरा भास्करने लिहिले की, ‘भारताची मान शरमेने झुकत आहे.’
भारताचे प्रख्यात कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह याच्या अटकेसाठी जंतरमंतरवर जवळपास महिनाभर आंदोलन करत होते. रविवारी (२८ मे) दिल्ली पोलिसांसोबत कुस्तीपटूंची बाचाबाची झाली. यानंतर त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे नोंदवले होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. यामध्ये एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूचा देखील समावेश आहे.
विभाग