मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Naseeruddin Shah: मुस्लिमांचा द्वेष करणं ही हल्ली फॅशन झालीय; नसिरुद्दीन शाह यांचं बेधडक विधान

Naseeruddin Shah: मुस्लिमांचा द्वेष करणं ही हल्ली फॅशन झालीय; नसिरुद्दीन शाह यांचं बेधडक विधान

Aarti Vilas Borade HT Marathi
May 30, 2023 05:11 PM IST

Naseeruddin Shah: 'आजकाल शिकलेल्या लोकांमध्ये देखील मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे' असे नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

Naseeruddin Shah
Naseeruddin Shah

कसदार अभिनयाबरोबरच राजकीय व सामाजिक विषयांवर बेधडक मत मांडण्यासाठी अभिनेते नसीरुद्दीन शाह ओळखले जातात. रंगमंच आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.

नसीरुद्दीन शाह यांनी एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, "काही चित्रपट आणि शो यांचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. यासोबतच चित्रपट आणि शो यांचा वापर निवडणुकीत मते मिळविण्यासाठीही केला जात आहे. सत्ताधारी पक्ष अतिशय चतुराईने त्यांचा वापर करतो आहे. त्यामुळेच आजकाल शिकलेल्या लोकांमध्ये देखील मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे."
वाचा: सुनील शेट्टीला यायचे अंडरवर्ल्डमधून फोन, काय होतं नेमकं प्रकरण जाणून घ्या

पुढे निवडणूक आयागोविषयी ते म्हणाले की, 'निवडणूक आयोगही अशा गोष्टींवर मौन बाळगतो. राजकीय पक्ष निवडणुकीसाठी धर्माचा वापर करतात तेव्हा निवडणूक आयोग गप्प बसतो. दुसरीकडे, अल्ला हू अकबर म्हणत कोणत्याही मुस्लिम नेत्याने मते मागितली असती तर आतापर्यंत मोठा गदारोळ झाला असता.'

नसीरुद्दीन शाह यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी त्यांची 'ताज-डिव्हाइडेड बाय ब्लड' (Taj divided by blood) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सीरिजमध्ये त्यांनी अकबर ही भूमिका साकारली. या सीरिजच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी 'मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते' असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले होते.

IPL_Entry_Point

विभाग