Swara Bhaskar Video: देशातील प्रमुख महिला पैलवानांनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाची दखल घेत नसल्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर सत्ताधारी नेत्यांवर भडकली आहे. आपले खेळाडु आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकतात तेव्हा फक्त सत्ताधारी नेते ढोल बडवतात. मात्र त्यांनी लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून एक नेताही त्यांना जाऊन भेटत का नाही, असा सवाल स्वरा भास्करने केला आहे