Star Kid: 'या' मराठमोळ्या स्टारकिडचे मोठ्या पडद्यावर पदार्पण; आईसोबतच साकारणार पहिली भूमिका!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Star Kid: 'या' मराठमोळ्या स्टारकिडचे मोठ्या पडद्यावर पदार्पण; आईसोबतच साकारणार पहिली भूमिका!

Star Kid: 'या' मराठमोळ्या स्टारकिडचे मोठ्या पडद्यावर पदार्पण; आईसोबतच साकारणार पहिली भूमिका!

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 21, 2024 01:43 PM IST

Sonali Khare Daughter: अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. तिच्या चित्रपटाची घोषणा झाली असून पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

Sonali Khare Daughter
Sonali Khare Daughter

Sonali Khare Daughter Debut: सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची हवा पाहायला मिळते. सुहाना खान, खुशी कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, आगस्त्य नंदा, न्यासा देवगण, पलक तिवारी, इब्राहिम अली खान हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. अशातच आता आता एका मराठमोळ्या स्टारकिडचे पदार्पण होणार आहे. ही स्टारकिड आईसोबतच स्क्रीन शेअर करणार असल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी सनाया आनंद ही चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. ती आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या'मायलेक' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. सनायाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यात सनाया आई सोनलीसोबतच स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे चर्चेत आहेत.
वाचा: क्राईम, थ्रिलर आणि हॉरर.... ओटीटीवर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार धमाकेदार वेब सीरिज!

आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

येत्या १९ एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर दिग्दर्शिका आहेत. तर या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

सोनाली खरेने मुलीसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणाली, "आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात प्रेमासोबत काही आंबट गोड क्षणही आहेत. प्रत्येक आईमुलीला हा चित्रपट जवळचा वाटेल. मुळात आम्ही खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावर खूप नैसर्गिकरित्या साकारता आले."

Whats_app_banner