मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: विमानतळावरून बाहेर येणाऱ्या शाहरुख खानने चाहत्याचा फोन भिरकावला? पाहा व्हिडीओ...

Shah Rukh Khan: विमानतळावरून बाहेर येणाऱ्या शाहरुख खानने चाहत्याचा फोन भिरकावला? पाहा व्हिडीओ...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 03, 2023 01:33 PM IST

Shah Rukh Khan Viral Video: या व्हिडीओत शाहरुखने चाहत्याचा हात बाजूला करताच त्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला धक्काबुक्की करून मागे ढकलल्याचे दिसत आहे.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan Viral Video: बॉलिवूड किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख एका व्यक्तीच्या हाताला धक्का देताना दिसत आहे. सदर व्यक्ती शाहरुख खानसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. शाहरुखचा हा व्हिडीओ मुंबई विमानतळाबाहेरचा आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, शाहरुखने त्या व्यक्तीचा हात पकडला आणि त्याला इतका जोरात धक्का दिला की, त्याच्या हातातून मोबाईलही खाली पडला. शाहरुखने त्या व्यक्तीचा हात बाजूला करताच त्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला धक्काबुक्की करून मागे ढकलले.

ट्रेंडिंग न्यूज

शाहरुख खानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शाहरुखच्या या वागण्यावर नेटकरी संतापले आहेत. बॉलिवूड कलाकरांनी चाहत्यांशी असे वागू नये, असे चाहते म्हणत आहेत. शाहरुख सौदी अरेबियाहून परतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता शाहरुखच्या या अशा वर्तनामुळे लोक त्याला ट्रोल करत आहेत. 'पठाण'च्या यशाने शाहरुखला हवा लागली असल्याचे लोक म्हणत आहेत. तर, काही नेटकरी त्याला आक्रमक आणि अहंकारी देखील म्हणत आहेत.

Hema Malini- Dharmendra: धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी लग्नानंतर मिळून खरेदी केला होता आलिशान बंगला!

शाहरुख खानचे जगभरात पसरले आहे. सगळे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असलेला शाहरुख खान अनेकदा आपल्या चाहत्यांशी खूपच प्रेमाने वागतो. अभिनेत्याच्या या वागण्यामुळे चाहते त्याचे नेहमीच कौतुक करतात. मात्र, यावेळी शाहरुख त्याच्या या स्वभावाच्या अगदी विरुद्ध वागण्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने त्याच्या एका चाहत्याला सेल्फी घेण्यास नकार देऊन धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता शाहरुख खान मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. किंग खान जेव्हा काळ्या कपड्यात विमानतळामधून बाहेर पडत होता, तेव्हा त्याला चाहत्यांच्या गर्दीने घेरले होते. यावेळी गर्दीतील एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी फोन घेऊन पुढे आला. मात्र, शाहरुखने चाहत्याला हाताने मागे ढकलून, स्वतःजवळ येण्यापासून रोखले. यावेळी, पापाराझी शाहरुखच्या नावाने ओरडत होते. परंतु, अभिनेता काहीही उत्तर न देता त्याच्या गाडीच्या दिशेने गेला. आता लोकांना शाहरुखचे हे वागणे अजिबात आवडलेले नाही.

IPL_Entry_Point