Hema Malini- Dharmendra Luxurious Bungalow: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या लग्नाला नुकतीच ४३ वर्ष पूर्ण झाली आहे. नुकतेच त्यांनी खास फोटो शेअर करून चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. बॉलिवूडच्या ‘बेस्ट कपल’पैकी एक असलेली ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील खास क्षण शेअर करत असते. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले होते. यामुळे हेमा मालिनी कधीच आपल्या सासरी जाऊ शकल्या नाहीत. त्याऐवजी हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी मिळून मुंबईत एक सुंदर आलिशान बंगला खरेदी केला होता.
अभिनेते धर्मेंद्र हे बॉलिवूडचे अतिशय दिग्गज अभिनेते आहेत. तर, हेमा मालिनी यांनी देखील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्या खूप चांगल्या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. आता त्या जगभरात स्वतःचे स्टेज शो करत आहेत. हेमा मालिनी यांनी राज कपूर यांच्यासोबत 'सपनो का सौदागर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.
यानंतर त्यांनी १९८०मध्ये अभिनेता धर्मेंद्र यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांनी मिळून सुमारे ३५ वर्षांपूर्वी मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे एक आलिशान बंगला खरेदी केला होता. त्यांचा हा बंगला अक्षरशः राजमहाल भासावा इतका सुंदर आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा हा आलिशान बंगला बाहेरून जितका सुंदर दिसतो, तितकाच आतून दिसतो. हे घर प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर्सनी डिझाइन केले आहे. घराच्या भिंतींवर खूप पेंटिंग्ज आहेत आणि संपूर्ण घर अतिशय पारंपारिक अंदाजात सजवण्यात आले आहे. घरातील पाहुण्यांच्या बसण्याच्या जागेपासून ते ड्रॉईंग रूमपर्यंत विविध रंगांचे मोठे सोफे लावण्यात आले असून, या बंगल्यात एक मोठे पूजाघर देखील आहे.
घराच्या सर्व खोल्यांमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत, ज्यातून बाहेरचे सुंदर दृश्य दिसते. हेमा मालिनी यांनीही त्यांच्या घरात एक कुत्रा पाळला आहे, जो त्यांचा खूप लाडका आहे. हेमा मालिनी यांनी हे घर अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. याच घरात त्यांनी यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहाना यांचे लग्न लावले होते. हेमा मालिनी सध्या यूपीमधील मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. मथुरेच्या खासदार असल्याने, हेमा यांनी तिथेही एक घर विकत घेतले आहे. सध्या धर्मेंद्र त्यांचा बहुतांश वेळ त्यांच्या हिमाचल प्रदेशातील फार्महाऊसवर घालवतात. मात्र, तरीही वेळात वेळ काढून ते हेमा मालिनी यांना भेटायला त्यांच्या मुंबईतील बंगल्याला भेट देतात.
संबंधित बातम्या