
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)
सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो. दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)
नुकतेच प्राजक्ताने हिरव्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती किलर फोटोपोज देताना दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)
हिरव्या रंगाच्या साडीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने पारंपारिक दागिने परिधान केले आहेत. हातात हिरव्या बांगड्या आणि नाकात नथ या लूकमध्ये ती मनमोहक दिसत आहे. (Photo: @prajakta_official/IG)


