मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ved Trailer: मला पोहोचवायचंच बघ तू! रितेश, जिनिलियाच्या 'वेड'चा ट्रेलर चर्चेत

Ved Trailer: मला पोहोचवायचंच बघ तू! रितेश, जिनिलियाच्या 'वेड'चा ट्रेलर चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 13, 2022 12:33 PM IST

Riteish Deshmukh Marathi Movie: वेड या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरमधील त्यांच्या डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

वेड
वेड (HT)

Riteish Deshmukh: 'माऊली' या चित्रपटाच्या यशानंतर सर्वजण बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या मराठी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. त्यानंतर रितेश 'वेड' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. आता या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वेड चित्रपटाच्या २ मिनिटे १० सेकंदाच्या ट्रेलरमधील जिनिलियाच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रितेश देशमुख हा एका मुलीच्या प्रेमात असतो. पण ती मुलगी त्याला सोडून जाते. त्यानंतर शाळेत त्याच्यासोबत शिक्षण घेणारी जिनिलिया त्याच्याशी लग्न करते. दरम्यान, 'ज्याचं आपल्यावर प्रेम नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला नाही कळणार' या जिनिलियाच्या डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीला पाहिलंत का? पहिल्यांदाच आली समोर

वेड चित्रपटात रितेश देशमुखच्या वडिलांच्या भूमिकेत अशोक सराफ असल्याचे पाहायला मिळते. अशोक सराफ यांनी ट्रेलरमधील मोजक्याच डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकंदरीत ट्रेलर पाहाता रितेश देशमुख, जिनिलिया डिसूजा, अशोक सराफ यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून 'वेड' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखने केला आहे. अजय-अतुल या जोडीने या चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग