मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीला पाहिलंत का? पहिल्यांदाच आली समोर

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीला पाहिलंत का? पहिल्यांदाच आली समोर

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 12, 2022 08:13 PM IST

Nawazuddin Siddiqui Daughter: सोशल मीडियावर नवाज आणि त्याच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी
नवाजुद्दीन सिद्दीकी (HT)

अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. त्याच्या चित्रपटांची सतत चर्चा सुरु असते. पण फार कमी वेळा नवाज खासगी आयुष्याविषयी बोलतो. नवाजला दोन मुले आहेत. पण आजपर्यंत ते कॅमेरासमोर आलेले नाहीत. त्यामुळे इतर स्टारकिड्स प्रमाणे नवाजच्या मुलांना देखील पाहण्यासाठी चाहते उत्सुकत होते. आता चाहत्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नवाजुद्दीन सिद्दीकीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुलीसोबत दिसत आहे. नवाजच्या मुलीला पाहून चाहते आनंदी झाले आहेत. दरम्यान, नवाजने काळ्या रंगाचा हूडी आणि जीन्स परिधान केली आहे. तर मुलीने काळ्या रंगाचा टीशर्ट, निळी पँट घातली आहे. त्यावर तिने डेनिम जॅकेट परिधान केले आहे. सध्या सोशल मीडियावर या बाप-लेकीच्या जोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नवाजच्या मुलीचे नाव शोरा सिद्दीकी असे आहे. शोरा पहिल्यांदाच कॅमेरासमोर आल्यामुळे लाजताना दिसत आहे. युजर्स या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. यूजर्सने, 'खूप छान', ‘खूप क्यूट’ अशा कमेंट्स व्हिडीओवर केल्या आहेत.

शनिवारी १० डिसेंबर रोजी नवाजने सोशल मीडियावर एक रिल्स शेअर केले होते. या रिल्समध्ये शोराचे लहानपणी पासूनचे फोटो होते. नवाजने हा व्हिडीओ शोराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तयार केला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय लव्ह #शोरासिद्दीकी" असे कॅप्शन दिले होते.

IPL_Entry_Point

विभाग