मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Khillar: बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरणार रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर! चाहत्यांनाही उत्सुकता

Khillar: बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरणार रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर! चाहत्यांनाही उत्सुकता

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 01, 2023 12:37 PM IST

Khillar Marathi Movie Announcement : महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे मोठे महत्त्व आहे. याच बैलगाडा शर्यतींचा थरार आता चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Rinku Rajguru-Lalit Prabhakar
Rinku Rajguru-Lalit Prabhakar

Khillar Marathi Movie Announcement: बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जल्लोष पाहायला मिळत आहे. शक्य त्या सगळ्याप्रकारची सुरक्षितता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती आयोजित होताना दिसत आहेत. याच धर्तीवर आता एक चित्रपट बनणार असून, या चित्रपटात मनोरंजन विश्वातील दोन मोठे चर्चित चेहरे झळकणार आहेत. ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता ललित प्रभाकर ही जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे मोठे महत्त्व आहे. याच बैलगाडा शर्यतींचा थरार आता चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. बैलगाडा शर्यतीवर आधारित ‘खिल्लार’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या ‘खिल्लार’ या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर, न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे 'खिल्लार' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

Maharashtra Shahir: मराठी माणसाने २००-४०० रुपये खर्च करावेत! ‘महाराष्ट्र शाहीर’ बघून भारावले जितेंद्र आव्हाड

नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी 'खिल्लार' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर देखील लाँच करण्यात आलं. येत्या काही दिवसांत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल.

मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून स्थान निर्माण केलेल्या मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेला ‘रिंगण’ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर मकरंद यांनी ‘यंग्राड’, ‘कागर’, ‘सोयरीक’, ‘पोरगं मजेतंय’ असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले असल्याने मकरंद यांनी बैलगाडा शर्यतींचे वातावरण अतिशय जवळून पाहिले आहे. त्यामुळेच आता हा विषय ते 'खिल्लार' चित्रपटातून मांडत आहे. या चित्रपटाविषयी बोलताना मकरंद माने म्हणाले, की बैलगाडा शर्यतीचा विषयच अगदी जिव्हाळाचा आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ पडद्यावर रंगवताना 'खिल्लार'मधून मैदान जोरदार रंगणार माझी खात्री आहे.

IPL_Entry_Point

विभाग