मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bheed Trailer: लॉकडाऊनची भीषण परिस्थिती दाखवणार अनुभव सिन्हा; राजकुमारच्या ‘भीड’चा ट्रेलर रिलीज!

Bheed Trailer: लॉकडाऊनची भीषण परिस्थिती दाखवणार अनुभव सिन्हा; राजकुमारच्या ‘भीड’चा ट्रेलर रिलीज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 10, 2023 12:16 PM IST

Bheed Trailer Out: संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेली कठीण परिस्थिती दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Bheed Trailer Out
Bheed Trailer Out

Bheed Trailer Out: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या आगामी 'भीड' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ‘भीड’ हा चित्रपट येत्या २४ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेली कठीण परिस्थिती दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 'भीड' चित्रपटाची कथा लॉकडाऊनच्या काळात लोकांना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्यांचे चित्रण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्यासह आशुतोष राणा, आदित्य श्रीवास्तव, पंकज कपूर, दिया मिर्झा यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'भीड' चित्रपटाचे दिग्दर्शन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केले आहे. या आधी अनुभव सिन्हा यांनी 'आर्टिकल १५' आणि 'मुल्क' सारखे चित्रपट केले आहेत. ‘भीड’ या चित्रपटाची कथा अनुभव सिन्हा, सौम्या तिवारी, सोनाली जैन यांनी लिहिली आहे. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'भीड' या चित्रपटाचा ट्रेलर आज (१० मार्च) रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात बनारसमधील गर्दीने होते. या ट्रेलरमध्ये घोषणा ऐकू येत आहे की, 'आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन होणार आहे.’ यानंतर, ट्रेलरमध्ये लॉकडाऊन दरम्यान रस्त्यांवर कशी गर्दी असते. लोकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि यासोबतच कोरोनादरम्यान ज्या परिस्थिती संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, त्या सर्व गोष्टी ट्रेलरमध्ये पाहायला मिळाल्या आहेत.

राजकुमार राव याने या चित्रपटाबद्दल सांगताना म्हटले की, ‘भीड हा २०२०च्या लॉकडाऊनची भीषण परिस्थिती दाखवणार आहे. देशभरात आणि जगभरातील कोट्यवधी लोकांना संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. भीडमध्ये काम करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक अनुभव होता. अनुभव सिन्हा वास्तविक जीवनातील कथा सांगण्यात मास्टर आहेत आणि हा चित्रपटही तसाच आहे.’

IPL_Entry_Point

विभाग