मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premach Cocktail: सक्षम कुलकर्णी करणार 'प्रेमाचं कॉकटेल'; गणपती बाप्पाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर लाँच!

Premach Cocktail: सक्षम कुलकर्णी करणार 'प्रेमाचं कॉकटेल'; गणपती बाप्पाच्या चरणी चित्रपटाचे पोस्टर लाँच!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 10, 2023 11:29 AM IST

Premach Cocktail Poster Launch: शहरांनी गिळंकृत केलेलं गावपण आणि आभासी स्वप्नांचा पाठलाग कुठल्या थराला घेऊन जातो याची सस्पेन्स थ्रिलर गोष्ट ‘प्रेमाचं कॉकटेल’मधून पाहायला मिळणार आहे.

Premach Cocktail
Premach Cocktail

Premach Cocktail Poster Launch: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक दमदार कथानक आणि मराठी चित्रपट सादर केले जात आहे. सस्पेन्स, थ्रिलरसह अनेक प्रेमकथा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आता प्रेमकथेवर आधारित एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. प्रेमकथेचा वेगळा पदर उलगडून दाखवणाऱ्या ‘प्रेमाचं कॉकटेल’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ग्रामीण तरुणाईच्या स्वप्नांची शहरात होणारी घुसमट आणि जीवघेणी स्पर्धा कशी तरुणाईला आपल्या झगमगाटात अडकवते. शहरांनी गिळंकृत केलेलं गावपण आणि आभासी स्वप्नांचा पाठलाग कुठल्या थराला घेऊन जातो याची सस्पेन्स थ्रिलर गोष्ट म्हणजे ‘प्रेमाचं कॉकटेल’ असे लेखक दिग्दर्शक महेंद्र बोरकर यांनी म्हटले आहे. ‘पक पक पकाक‘, ‘दे धक्का’ फेम अभिनेता सक्षम कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दत्ता इंद्रजित म्हस्के यांनी ‘प्रेमाचं कॉकटेल’ची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र बोरकर करणार आहेत. चित्रपटात सक्षम कुलकर्णी, मानिनी दुर्गे, शिवराज वाळवेकर, आरती शिंदे, अनिल नगरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रोहित नागभिडे यांचे संगीत, रोहन पाटील यांचे संकलन, करण तांदळे छायांकनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यकारी निर्माता म्हणून सुमीत कुलकर्णी काम पाहणार आहेत. उत्तम स्टारकास्ट, मजेशीर गोष्ट यांचा मिलाफ असलेल्या चित्रपटाचं पोस्टरही लक्षवेधी आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग