वर्ल्डकप ट्रॉफी कोणाकडे जाणार याचा निर्णय रविवारी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा विश्वचषक जिंकला आहे, तर टीम इंडियाने दोनदा वर्ल्डकप पटकावला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावेळी कोणाला वर्ल्डकप मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी केलेल्या भविष्यवाणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रजनीकांत यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप फायनल वर भविष्यवाणी केली आहे. 'यावेळी भारत १०० टक्के वर्ल्ड कप जिंकणार' असे रजनीकांत यांनी म्हटले आहे. आता रजनीकांत यांची भविष्यवाणी कितपत खरी होते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
वाचा: व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांनी मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण?
रजनीकांतने भारत आणि न्यूझीलंड सामन्याविषयी पीटीआयशी बोलताना ही भविष्यवाणी केली. 'सुरुवातीला मी घाबरलो होतो. त्यानंतर जेव्हा हळूहळू विकेट जाऊ लागल्या तेव्हा मला बरे वाटले. सुरुवातीच्या दीड तास मी खूप निराश होतो. पण मला १०० टक्के खात्री आहे की वर्ल्ड कप आपणच जिंकणार' असे रजनीकांत म्हणाले.
क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघातील हा शानदार सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संपूर्ण देश आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रविवारी (१९ नोव्हेंबर) होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट वर्ल्डकपती फायनल पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी भारतीय मध्य रेल्वेने स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पेशल ट्रेन देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. सामना संपल्यानंतर ही ट्रेन मध्यरात्री अहमदाबादहून सुटेल आणि CSMT ला पोहोचेल.