मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : रजनीकांत नावाचा चमत्कार! एन्ट्री घेताच माहौल कसा बदलला बघाच!

Viral Video : रजनीकांत नावाचा चमत्कार! एन्ट्री घेताच माहौल कसा बदलला बघाच!

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 27, 2024 11:02 AM IST

Rajinikanth Viral Video : सध्या सोशल मीडियावर सुपरस्टार रजनीकांतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांतच्या एण्ट्रीने पूर्ण माहौलचा बदललेला दिसत आहे.

Rajinikanth
Rajinikanth

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत हे कायमच चर्चेत असतात. मग कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी एखाद्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे. दक्षिणेकडे तर रजनीकांत यांची हवा पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर देखील रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांच्या एण्ट्रीने पूर्ण माहौल तयार केला आहे.

रजनीकांत हे लवकरच 'लाल सलाम' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांची मुलगी ऐश्वर्याने केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ऑडीओ लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात रजनीकांत यांची एण्ट्री होताच संपूर्ण माहौल बदलला आहे. चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. व्हिडीओमध्ये रजनीकांत यांनी राखाडी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांचा हा लूक पाहण्यासारखा होता. सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: भरधाव गाडी उलटली अन्...; प्रसिद्ध गायकाचा परदेशात भीषण अपघात

एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत 'वयाच्या ७२व्या वर्षी देखील या माणसाची जादू कायम आहे. थलायवा तुझे मनापासून आभार. तुम्ही आमचे चांगले मनोरंजन केले आहे.. तुझी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'हा खरा सुपरस्टार... ७३ वर्षांचा.. दाढी केलेली नाही, केस रंगवलेले नाहीत, डोक्यावर विग नाही तरीही तरुण अभिनेत्या सारखा दिसतो... थलवा हा खरा सुपरस्टार आहे' असे म्हटले आहे.

'लाल सलाम' हा रजनीकांत यांचा आगामी तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपटाचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांतने केले आहे. चित्रपटाची निर्मिती शुभस्करन यांनी केली आहे. चित्रपटात विन्ह्यू विशाल, विक्रतम विघ्नेश, लिविंगस्टोन, सेनथिल आणि थंबी रमायनाथ हे कलाकार दिसणार आहेत

WhatsApp channel

विभाग