Lal Salaam Rajinikanth as Moideen Bhai : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा 'लाल सलाम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात स्वत: रजनीकांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे.
लाल सलाम या चित्रपटाचा ट्रेलर हा तमिळ भाषेत प्रदर्शित झाला आहे. तरी देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. २ मिनिटे २८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये राजकारणात सत्ता, धर्म, क्रोध या गोष्टी किती आणि कशा प्रकारे परिणाम करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा ही मोईद्दीन भाईच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसत आहे. तसेच चित्रपटात मुख्य भूमिकेत विक्रांत आणि विष्णु विशाल दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये कपिल देवची झलक पाहायला मिळते.
वाचा: "पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच", आतिफ अस्लमच्या बॉलिवूड पदार्पणावर मनसेची भूमिका
ऐश्वर्या रजनीकांतनं दिग्दर्शित आणि लायका प्रॉडक्शनच्या वतीनं निर्मित रजनीकांतच्या यांच्या या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्यामध्ये त्यांनी मोईद्दीन भाई ची भूमिका साकारली आहे. यापूर्वी त्याच्या टीझरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हा चित्रपट क्रिकेट आणि मोईद्दीन भाई यांच्या अवतीभोवती फिरताना दिसते. या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान असून हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
'लाल सलाम' या चित्रपटाचे मुंबई, चेन्नई आणि पाँडिचेरी येथे चित्रीकरण करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षीपासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवरील रजनीकांत आणि कपिल देव यांचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन ते केवळ एकमेकांची भेट घेत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता कपिल देव चित्रपटात दिसणार असल्याचे ट्रेलरवरुन स्पष्ट झाले आहे.
संबंधित बातम्या