मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prathamesh Parab: प्रथमेश परब बोहल्यावर चढणार? ‘त्या’ पोस्टमागील गुपित अखेर उलगडलं!

Prathamesh Parab: प्रथमेश परब बोहल्यावर चढणार? ‘त्या’ पोस्टमागील गुपित अखेर उलगडलं!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 22, 2022 12:34 PM IST

Prathamesh Parab: ‘टाईमपास’ फेम मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब याच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालतेय.

Prathamesh Parab New Movie
Prathamesh Parab New Movie

Prathamesh Parab: ‘टाईमपास’ फेम मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब याच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. 'आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं... पत्रिका गुरुवारी पाठवतोय', असे म्हणत प्रथमेशने आपला एक फोटो शेअर केला होता. अखेर प्रथमेशच्या या सोशल मीडियावरील पोस्टच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, प्रथमेश खऱ्या आयुष्यात नव्हे, तर मोठ्या पडद्यावरील आयुष्यात बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'ढिशक्यांव' चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये प्रथमेश मुंडावळ्या बांधून, नवरा बनून त्याच्या बायकोसोबत पाहायला मिळतोय. मात्र, या पोस्टरमध्ये प्रथमेशच्या बायकोच्या हातात बंदूक पाहायला मिळत असून, ती बंदूक तिने प्रथमेशवर रोखून धरलेली आहे, तर प्रथमेश आणि अहेमदच्या गळयात हार पाहायला मिळतोय. त्यामुळे हा नेमका गोंधळ काय आहे, याचं गुपित १० फेब्रुवारी २०२३ला उलगडणार आहे.

या नव्याकोऱ्या चित्रपटात प्रथमेश परब सोबत संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे, प्रणव पिंपळकर, राजीव पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, आसावरी नितीन, प्रसाद खैरे, साक्षी तोंडे, महेश घाग, मधु कुलकर्णी, बादशाह शेख, अमित दुधाने, शिव माने, विनया डोंगरे, हर्ष राजपूत, सोमनाथ गिरी या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. नवोदित अभिनेता अहेमद देशमुख 'ढिशक्यांव' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे.

'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटात हे सर्व कलाकार मिळून काय धुडगूस घालणार आहेत, याकडे साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. प्रथमेशच्या लग्नाची ही धमाल 'ढिशक्यांव' चित्रपटातून १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point