मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Diwakar Kumar: ‘वध’च्या यशानंतर अभिनेत्याला लागली मोठी लॉटरी; नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजमध्ये झळकणार!

Diwakar Kumar: ‘वध’च्या यशानंतर अभिनेत्याला लागली मोठी लॉटरी; नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजमध्ये झळकणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 22, 2022 08:55 AM IST

Diwakar Kumar New Web series: ‘वध’ हा अलीकडेच रिलीज झालेला बॉलिवूड चित्रपट अभिनेता दिवाकर कुमार याच्यासाठी नवी सुरुवात आहे.

Diwakar Kumar
Diwakar Kumar

Diwakar Kumar New Web series: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि अभिनेते संजय मिश्रा अभिनित ‘वध’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. या चित्रपटात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्यासोबतीनेच नवोदित अभिनेता दिवाकर कुमार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटात दिवाकर कुमार याने साकारलेल्या पात्राला आणि त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आता दिवाकर कुमार याला नव्या प्रोजेक्ट्सची लॉटरी लागली आहे. लवकरच अभिनेता नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

‘वध’ हा अलीकडेच रिलीज झालेला बॉलिवूड चित्रपट अभिनेता दिवाकर कुमार याच्यासाठी नवी सुरुवात आहे. या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्याही मुख्य भूमिका होत्या. दिवाकर कुमार याने ‘वध’ या चित्रपटात दिवाकर मिश्रा हे पात्र रंगवले आहे. ही भूमिका साकारताना दिवाकर याच्या साधेपणा आणि खरेपणाचे त्याच्या फॅन्स आणि सिनेक्षेत्रातल्या सहकलाकारांनी कौतुक केले आहे. दिवाकरला या भूमिकेसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

आता दिवाकर एका वेब सीरिजमध्ये झळकणार असून, त्याचा हा पुढील प्रोजेक्ट नेटफ्लिक्सवर लवकरच रिलीज होणार आहे. 'वध'च्या यशामुळे उत्साहात असलेला दिवाकर म्हणाला की, 'नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणे ही एक मोठी जबाबदारी होती. मी थोडासा चिंतेत होतो, पण मी संयमाने वधच्या प्रदर्शनाची वाट पाहत होतो. यातील दिवाकर मिश्रा या मी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षक कसे प्रतिसाद देतात, हेही जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. ही एक अनोखी भूमिका होती आणि प्रेक्षकांनी चित्रपटातील या भूमिकेचं केलेलं कौतुक आणि दिलेले प्रेम पाहून मला आनंद झाला आहे. आता मी एका वेब सीरिजमध्ये काम करत असून, या सीरिजची कथा अतिशय हटके आहे.’

'वध'हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, ‘जे स्टुडिओ’ आणि ‘नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शन’ने याची निर्मिती केली होती. ‘लव फिल्म्स’चे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘वध’ हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

IPL_Entry_Point

विभाग