मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pavitraa Puniya: शूटिंगच्या सेटवरच प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ब्लाऊजने दिला धोका! व्हिडीओ बघाच...

Pavitraa Puniya: शूटिंगच्या सेटवरच प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ब्लाऊजने दिला धोका! व्हिडीओ बघाच...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Oct 27, 2023 10:15 AM IST

Pavitraa Puniya Viral Video: अभिनेत्री काहीच दिवसांपूर्वी उप्प्स मुमेंटची शिकार झाली होती. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ स्वतः पवित्रा हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Pavitraa Puniya Viral Video
Pavitraa Puniya Viral Video

Pavitraa Puniya Viral Video: 'बिग बॉस' या वादग्रस्त टीव्ही शोमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री पवित्रा पुनिया सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नेहमीच आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्या पवित्रा पुनिया हिने नुकताच स्वतःचा एक असं व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. अभिनेत्री काहीच दिवसांपूर्वी उप्प्स मुमेंटची शिकार झाली होती. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ स्वतः पवित्रा हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शूटिंग दरम्यान अभिनेत्रीचा ब्लाऊज फाटताना दिसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वीच पवित्रा पुनिया हिने एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट देखील लिहिली होती. यात तिने आपल्यासोबत नेमकी काय घटना घडली ते सांगितलं होतं. पवित्रा पुनिया हिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एका सीन दरम्यान धावताना तिचा ब्लाऊज फाटला आहे. हा प्रश्न तिने एका टीव्ही वाहिनीवर देखील पाहिला. यासोबत तिने एक पोस्ट देखील लिहिली आहे.

Anushka Sharma: अनुष्का-विराटकडे पुन्हा गोड बातमी? अभिनेत्री शेअर केला 'बेबी बंप' फोटो!'

यात ती म्हणाली की, 'आज मी पहिल्यांदाच 'वॉर्डरोब मालफंक्शन' नावाची गोष्ट अनुभवली. #Spinechilling मी नशीबवान होते की, यातून वाचले. या भयानक घटनेतून मला कळले की, माझ्या संपूर्ण क्रूचे माझ्यावर किती प्रेम आहे. या क्षणाचा विचार करताना मला जाणवले, की मी खूप भाग्यवान आहे. या घटनेनंतर लगेच कॅमेरे बंद झाले आणि मला ऐकू येत होते की, 'लवकर कपडे घेऊन या' आणि 'कॅमेरा कट करा'. ते सगळेच इकडे तिकडे धावत होते आणि सगळेच मदत करत होते.'

पवित्रा पुनियाने पुढे लिहिले की, 'या घटनेनंतर माझ्या कॅमेरा टीमचा सौरभ धावत माझ्या दिशेने आला... त्याने मला कव्हर केलं आणि कॅमेरा टीमने लगेच कॅमेरा बंद केला. माझा सगळं स्टाफही तिथे होता.' यावेळी तिने आपल्या संपूर्ण स्टाफचं कौतुक केलं. आणि या प्रसंगात अभिनेत्री असो वा कोणतीही महिला, त्यांच्यावर नेमका काय प्रसंग ओढवतो, हे सांगितलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग