मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; पहिल्याचं दिवशी १०० कोटींचा टप्पाही ओलांडला!
Pathaan
Pathaan

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; पहिल्याचं दिवशी १०० कोटींचा टप्पाही ओलांडला!

27 January 2023, 9:40 ISTHarshada Bhirvandekar

Pathaan Box Office Collection: पहिल्याच दिवशी ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे.

Pathaan Box Office Collection: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पठाण’ या चित्रपटाने आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान याने ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतरही शाहरुखची जादू तसूभरही कमी झालेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

‘पठाण’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे अधिकृत आकडे आता समोर आले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा देखील ओलांडला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल १०६ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ‘पठाण’ची पहिल्या दिवशीची कमाई जाहीर केली आहे.

तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘पठाणने वर्ल्डवाईड १०६ कोटींचे कलेक्शन केले आहे. जगभरात रिलीज झालेल्या हिंदी चित्रपटांच्या ओपनिंगचा रेकॉर्ड पठाणने मोडीत काढला आहे.’ शाहरुख खान याने ‘पठाण चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. ‘रोमान्स किंग’ अशी ओळख असलेल्या अभिनेता शाहरुख खान याचा धाकड अंदाज ‘पठाण’च्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.