Athiya Shetty-KL Rahul Wedding: अथिया-केएल राहुलला महागडा आहेर मिळालाच नाही! शेट्टी कुटुंबाचा खुलासा
Athiya Shetty-KL Rahul Wedding Gifts: केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्न बंधनात अडकल्यानंतर त्यांना आहेरात काय काय मिळालं याची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू होती.
Athiya Shetty-KL Rahul Wedding Gifts: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा लग्न सोहळा पार पडला आहे. अतिशय खाजगी अशा या सोहळ्यात केवळ मोजकेच लोक सामील झाले होते. सध्या सोशल मीडियावर देखील या लग्न सोहळ्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे या लग्नातील साधेपणा लोकांना आवडला आहे. तर, दुसरीकडे या लग्नात नव दाम्पत्याला मिळालेल्या महागड्या आहेरामुळे देखील हा सोहळा चर्चेत आहे. मात्र, आता या महागड्या आहेराविषयी शेट्टी कुटुंबाने एक मोठा खुलासा केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्न बंधनात अडकल्यानंतर त्यांना आहेरात काय काय मिळालं याची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार अनेक सेलिब्रिटींनी त्यांना अतिशय महागडी गिफ्ट्स दिल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता शेट्टी कुटुंबाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. शेट्टी कुटुंबियांच्या एका जवळच्या नातेवाईकाने सांगितले की, अथिया आणि केएल राहुलला अशी कोणतही गिफ्ट्स मिळालेली नाहीत. माध्यमांनी अशी चुकीची माहिती देऊ नये. ही सगळी माहिती निराधार आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये अथिया आणि केएल राहुल यांना लग्नात आहेर म्हणून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्याचे म्हटले जात होते. यापैकी काही गोष्टींची माहिती समोर आली होती. केएक राहुल आणि अथियाला लग्नात लक्झरी आणि महागड्या भेटवस्तू मिळाल्या असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, शेट्टी कुटुंबीयांनी या सगळ्या वृत्तान नकार देत, अशा कोणत्याही भेटवस्तू मिळाल्या नसल्याचे म्हटले आहे.
भेटवस्तूंमध्ये ‘या’ गोष्टींची होती चर्चा!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील शेट्टीने या जोडप्याला मुंबईत एक सुपर लक्झरी अपार्टमेंट गिफ्ट केल्याचे म्हटले होते. याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये आहे. जॅकी श्रॉफने या जोडीला ३० लाखांचे घड्याळ, अर्जुन कपूरने १.५ कोटी रुपयांचे डायमंड ब्रेसलेट, तर सलमान खानने १.६४ कोटी रुपयांची ऑडी कार भेट दिल्याचे देखील म्हटले जात होते. तर, महेंद्रसिंह धोनीने आपल्या लाडक्या मित्राला ८० लाखांची बाईक आणि विराट कोहलीने २.१७ कोटींची एक BMW कार भेट दिल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते.