मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bobby Deol Birthday: ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीशी करायचं होतं बॉबीला लग्न; धर्मेंद्रमुळे घ्यावी लागली माघार!
Bobby and dharmendra Deol
Bobby and dharmendra Deol

Bobby Deol Birthday: ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीशी करायचं होतं बॉबीला लग्न; धर्मेंद्रमुळे घ्यावी लागली माघार!

27 January 2023, 8:43 ISTHarshada Bhirvandekar

Happy Birthday Bobby Deol: चित्रपटांमुळे चर्चेत असणारा बॉबी देओल अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला आहे.

Happy Birthday Bobby Deol: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आज (२७ जानेवारी) आपला ५४वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉबीचा जन्म एका फिल्मी कुटुंबात झाला असल्याने, त्याला अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. मात्र, तरीही त्याला मनोरंजन विश्वात स्थिरावण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. वडील धर्मेंद्र यांच्या पावर पाऊल ठेवत बॉबीनेही बॉलिवूडची वाट धरली. ‘धर्मवीर’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्याने आल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तर, ‘बरसात’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक अनेक सुपरहिट चित्रपट केले.

ट्रेंडिंग न्यूज

चित्रपटांमुळे चर्चेत असणारा बॉबी देओल अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला आहे. बॉलिवूडमध्ये अफेअर्स आणि ब्रेकअपच्या चर्चा होणे, तसे नवे नाही. मात्र, काही कलाकारांच्या नात्याच्या चर्चा वर्षानुवर्षे चालतात. अशाचपैकी एक होती बोली देओल आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांच्या नात्याची चर्चा... बॉबी देओल आणि नीलम कोठारी ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र, त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. याला कारणीभूत ठरले ते बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र.

बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांनी एकमेकांना तब्बल ५ वर्षे डेट केले होते. दोघांनाही आपले नाते पुढे न्यायचे होते. मात्र, या नात्याला धर्मेंद्र यांचा कडाडून विरोध होता. आपल्या मुलाने कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करू नये, अशी धर्मेंद्र यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी या नात्याला विरोध केला आणि म्हणूनच पुढे बॉबी-नीलमच्या नात्यात वितुष्ट आले. हळूहळू या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि हे नातेच तुटले.

धर्मेंद्र यांनी नकार दिल्यामुळे बॉलिवूडची लोकप्रिय जोडी अर्थात नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांची जोडी तुटली. दोघांनीही आपापल्या बाजू लक्षात घेऊन ब्रेकअप करणे योग्य समजले. यानंतर बॉबी देओल याने तान्यासोबत लग्न केले.

विभाग