मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Movie Leaked: काय सांगता... रिलीज होताच शाहरुख खानच्या ‘पठाण’ची एचडी प्रिंट लीक?
Pathaan
Pathaan

Pathaan Movie Leaked: काय सांगता... रिलीज होताच शाहरुख खानच्या ‘पठाण’ची एचडी प्रिंट लीक?

25 January 2023, 9:47 ISTHarshada Bhirvandekar

Pathaan: ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज होताच इंटरनेटवर लीक झाल्याचे म्हटले जात आहे.

Pathaan: आज अवघं मनोरंजन विश्व ‘पठाण’मय झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते, तो ‘पठाण’ हा चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटातून अभिनेता शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. केवळ शाहरुख खानचे चाहतेच नाही, तर सगळेच प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. मात्र, हा चित्रपट रिलीज होताच इंटरनेटवर लीक झाल्याचे म्हटले जात होते. मात्र, यामागचे सत्य वेगळेच आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोणताही चित्रपट रिलीज होताच लगेचच त्याची थिएटर कॉपी इंटरनेटवर लीक होते. या पायरसीमुळे अनेक बिग बजेट चित्रपटांना मोठा फटका बसतो. पायरसीला बळी पडू नका असे आव्हान अनेकदा कलाकार चाहत्यांना करतात. ‘पठाण’ बाबतीतही असेच काही घडले आहे. जेव्हा निर्मात्यांनी पायरसीबद्दल आव्हान केले, तेव्हा सोशल मीडियावर अफवा पसरल्या की ‘पठाण’ एचडीमध्ये काही वेबसाईटवर लीक झाली आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर मोठा परिणाम होऊ शकतो. चित्रपटाविषयी ही अफवा वेगाने पसरली. 

मात्र, कोईमोईने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, ही फक्त एक अफवा आहे आणि पठाण लीक झालेला नाही. अशा परिस्थितीत ही बातमी शाहरुखसाठीच नाही तर संपूर्ण ‘पठाण’ टीम आणि बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र, जर चित्रपट खरोखरच लीक झाला, तर त्याचा कलेक्शनवर वाईट परिणाम होऊ शकतो.

‘पठाण’ हा चित्रपट केवळ शाहरुख खानसाठी महत्त्वाचा चित्रपट नाही, तर दीपिका आणि जॉनच्या करिअरसाठीही खूप खास आहे. या चित्रपटातून शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे. या चित्रपटात सलमान ‘टायगर’च्या भूमिकेत आणि शाहरुख ‘पठाण’च्या भूमिकेत पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पठाण पहिल्या दिवशी सुमारे ४० ते ५० कोटींची कमाई करू शकतो.