मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Parveen Babi Birthday: ७०च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Parveen Babi Birthday: ७०च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 04, 2023 08:06 AM IST

Parveen Babi Birth Anniversary : ज्याकाळात मोठ्या पडद्यावर अभिनेत्री साडी नेसून वावरताना दिसायच्या, त्याचकाळात परवीन बाबी यांनी मनोरंजन विश्वात एन्ट्री घेत अभिनेत्रीच्या इमेजची ही चौकट मोडून काढली होती.

Parveen Babi
Parveen Babi

Parveen Babi Birth Anniversary : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या, ज्या त्यांच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे परवीन बाबी. ज्या काळात मोठ्या पडद्यावर अभिनेत्री साडी नेसून वावरताना दिसायच्या, त्याचकाळात परवीन बाबी यांनी मनोरंजन विश्वात एन्ट्री घेत अभिनेत्रीच्या इमेजची ही चौकट मोडून काढली. बिनधास्त अन् बोल्ड अशी ओळख मिळवणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी यांचं वैयक्तिक अन् व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं.

ट्रेंडिंग न्यूज

परवीन बाबी यांचा जन्म ४ एप्रिल १९४९ रोजी जुनागढमधील एका मुस्लीम कुटुंबात झाला होता. पदवी शिक्षणपूर्ण झाल्यानंतर परवीन बाबी यांनी मॉडेलिंग क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला होता. एकदा कॉलेजबाहेर सिगरेट ओढत असताना दिग्दर्शक बीआर इशारा यांची नजर परवीन बाबी यांच्यावर पडली. परवीन बाबी यांचा बिनधास्त अंदाज बघूनच त्यांनी आपल्या चित्रपटाची अभिनेत्री म्हणून त्यांची निवड केली. बीआर इशारा यांनी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी आणि परवीन बाबी ही जोडी घेऊन ‘चरित्र’ हा चित्रपट केला. या चित्रपटाला फारसं यश मिळालं नसलं तरी, परवीन बाबी यांना मात्र लोकप्रियता मिळाली.

या चित्रपटानंतर परवीन बाबी यांच्याकडे अनेक चित्रपट आले. मात्र, त्यांना खरी ओळख १९७४च्या ‘मजबूर’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात परवीन बाबी यांच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरली. त्यांनी ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘शान’ ‘कालिया’ या सारखे सुपरहिट चित्रपट दिले. परवीन यांना त्याकाळात इतकी लोकप्रियता मिळाली की, ‘टाईम मॅगझिन’च्या कव्हर पेजवर झळकण्याचा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या बॉलिवूड कलाकार ठरल्या.

परवीन यांचे व्यावसायिक आयुष्य जितके गाजले, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. डॅनी, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत परवीन बाबी यांचे नाव जोडले गेले होते. महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना परवीन बाबी यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. या आजारात त्यांना वेगवेगळे भास व्हायचे. शेवटच्या काळात त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. दोन-तीन दिवस दूध आणि पेपर घराबाहेर पडून असल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले होते. त्यावेळी पोलिसांनी घरच दरवाजा तोडून परवीन बाबी यांचा मृतदेह बाहेर काढला होता.

IPL_Entry_Point

विभाग