मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pallavi Joshi Birthday: मराठीच नव्हे तर हिंदी अन् गुजराती मनोरंजन विश्व गाजवणारी पल्लवी जोशी!

Pallavi Joshi Birthday: मराठीच नव्हे तर हिंदी अन् गुजराती मनोरंजन विश्व गाजवणारी पल्लवी जोशी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 04, 2023 07:28 AM IST

Happy Birthday Pallavi Joshi: अभिनेत्री पल्लवी जोशी हिने अगदी लहानपणापासूनच मनोरंजनविश्वात काम करायला सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

Pallavi Joshi
Pallavi Joshi

Happy Birthday Pallavi Joshi: ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांनाच थक्क करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा आज (४ एप्रिल) वाढदिवस आहे. पल्लवी अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल आणि चित्रपट निर्माती देखील आहे. तिचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी मुंबईत झाला. आज पल्लवी तिचा ५४वा वाढदिवस साजरा करत आहे. 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटात पल्लवी जोशीने ‘राधिका मेनन’ हे पात्र साकारले होते. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात पल्लवी नकारात्मक भूमिकेत दिसली असली, तरी तिच्या अभिनायचे खूप कौतुक झाले.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री पल्लवी जोशी हिने अगदी लहानपणापासूनच मनोरंजनविश्वात काम करायला सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. पल्लवीने आतापर्यंत अनेक गाजलेले हिंदी-मराठी चित्रपट, तसेच टेलिव्हिजन मालिकांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. 'वो छोकरी' या चित्रपटातून पल्लवीला पहिली संधी मिळाली होती. पल्लवीने सूत्रसंचालन केलेला 'सा रे ग मा पा' लिटिल चॅम्प्स हा रिअॅलिटी शो प्रचंड गाजला होता.

पल्लवी जोशी आपला कोणताही नवा प्रोजेक्ट निवडताना अतिशय काळजी घेते. अनेकदा ती मनोरंजन विश्वातून दुरावल्या सारखी वाटते. पण, पुन्हा एकदा नव्या जोमाने एखादी हटके भूमिका घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. पल्लवीने केवळ हिंदीच नव्हे तर, गुजराती आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘आदमी सडक का’, ‘डाकू और महात्मा’, ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटांमध्ये पल्लवी बाल कलाकार म्हणून झळकली होती. तर, ‘अल्पविराम’, ‘मिस्टर योगी’, ‘भारत एक खोज’, ‘जूस्तजू’, ‘मृगनयनी’, ‘तलाश’, ‘इम्तिहान’, ‘ग्रहण’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील तिने आपला दमदार अभिनय दाखवला आहे.

मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या पल्लवी जोशीने १९९७मध्ये चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. पल्लवी आणि विवेक यांची पहिली भेट एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना जवळपास तीन वर्षे डेट केले. त्यांनतर २८ जून १९९७ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.

IPL_Entry_Point

विभाग