मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raj Thackeray : आनंद दिघेंवरील चित्रपटानंतर आता राज ठाकरेंवर येणार नाटक

Raj Thackeray : आनंद दिघेंवरील चित्रपटानंतर आता राज ठाकरेंवर येणार नाटक

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 18, 2023 01:37 PM IST

Raj Thackeray : आता 'बाळासाहेबांचा राज' हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे (HT)

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आनंद दिघे यांच्यावर आधारित 'धर्मवीर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता 'बाळासाहेबांचा राज' हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'बाळासाहेबांचा राज' या दोन अंकी नाटकाचा शुभारंभ हिंदूहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सोमवार दिनांक 23 जानेवारीला होणार आहे. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे दुपारी ४.३० वाजता या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.
वाचा: आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार? मंगेश देसाईने केली 'धर्मवीर २'ची घोषणा

'बाळासाहेबांचा राज' या नाटकाच्या सन्मानिकेचे उदघाटन मकार संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. त्यावेळी मनसे नेते,माननीय श्री.बाळा नांदगावकर साहेब हे उपस्थित होते. या नाटकात सचिन नवरे, प्रफुल आचरेकर, नितीन बोढारे हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अनिकेत बंदरकरने केले आहे. हे नाटक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला राजकीय विश्वातील आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे.

IPL_Entry_Point