मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nagarjuna: नागार्जुनने मुलगा नागाचैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला...

Nagarjuna: नागार्जुनने मुलगा नागाचैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला...

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 16, 2022 11:44 AM IST

नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. आता नागार्जुनने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नागार्जुन
नागार्जुन (HT)

दाक्षिणात्य सुपरस्टार नागाचैतन्य हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. नुकताच तो दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसला होता. त्यानंतर नागार्जुन दिग्दर्शक करण जोहरच्या ऑफिसमध्ये दिसला होता. त्यावेळी त्याने मीडियाशी संवाद साधला. दरम्यान, त्याने मुलगा नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नागार्जुन म्हणाला की, 'ते आनंदी आहेत. मी केवळ इतकेच पाहात आहे. हे माझ्यासाठी खूप चांगले आहे. हा एक अनुभव आहे जो त्यांनी अनुभवला आहे. दुर्दैवाने सगळे काही झाले आहे. आपण याविषयी सतत बोलू शकत नाही. हे आमच्या आयुष्यातून बाहेर गेले आहे. आशा आहे की असा वाईट काळ सर्वांच्या आयुष्यातून निघून जाऊ दे.'
वाचा: चिमुकलीचा 'सामी'वर भन्नाट डान्स, रश्मिकाने व्यक्त केली भेटण्याची इच्छा

वर्षाच्या सुरुवातीला नागार्जुनने नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिल्याच्या चर्चांना अफवा म्हटले होते. 'सोशल मीडियावर समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाबाबत माझी प्रतिक्रिया आली असे सांगण्यात येत आहे. पण या सर्व अफवा आहेत. मी सर्वांना विनंती करतो की अशा अफवा पसरवणे बंद करा' या आशयाचे ट्वीट केले होते.

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग