मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rashmika Mandanna: चिमुकलीचा 'सामी'वर भन्नाट डान्स, रश्मिकाने व्यक्त केली भेटण्याची इच्छा

Rashmika Mandanna: चिमुकलीचा 'सामी'वर भन्नाट डान्स, रश्मिकाने व्यक्त केली भेटण्याची इच्छा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 14, 2022 02:54 PM IST

व्हिडीओ पाहून रश्मिकाने चिमुकलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.

रश्मिका मंदाना
रश्मिका मंदाना (HT)

काही दिवसापूर्वी 'पुष्पा द राइज' हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने रेकॉर्ड तोड कमाई केली होती. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. आता या चित्रपटातील 'सामी' गाण्यावर एका चिमुकलीने डान्स केला आहे. तो पाहून रश्मिकादेखील आश्चर्यचकित झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रश्मिकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ रिट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील चिमुकली सामी गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहण्यासारखा आहे. रश्मिकाने हा व्हिडीओ रिट्वीट करत, 'हा व्हिडीओ पाहून माझा दिवस सार्थकी लागला. मला या क्यूट चिमुकलीला भेटायचे आहे. कसे भेटता येईल' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वाचा : 'बिग बॉस मराठी ४'च्या स्पर्धकांची करोना निर्बंधांतून सुटका

कामाविषयी बोलायचे झाले तर रश्मिका लवकरच 'गूडबाय' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गूडबाय चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलने केले आहे. या चित्रपटात नीना गुप्‍ता, पल्‍लवी गुलाटी, एली अवराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि अभ‍िषेक खान हे कलाकार दिसणार आहेत. 'गूडबाय' हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग