मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Don 3: सावधान! 'डॉन' पुन्हा येतोय; अमिताभ, SRKच्या जागी 'या' अभिनेत्याची वर्णी

Don 3: सावधान! 'डॉन' पुन्हा येतोय; अमिताभ, SRKच्या जागी 'या' अभिनेत्याची वर्णी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 19, 2024 08:30 PM IST

Ranveer Singh Don 3: यावेळेस शाहरुख खान या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत दिसणार नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता अखेर कोणता अभिनेता दिसणार हे स्पष्ट झाले आहे.

Don 3
Don 3

Ranveer Singh: अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तरने काही दिवसांपूर्वी 'डॉन ३' या चित्रपटाची घोषण केली. या चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सुकता आता गगनाला भिडली आहे. यावेळेस शाहरुख खान या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत दिसणार नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, ज्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह डॉनच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली. त्या पाठोपाठ आता फरहानने चित्रपटाविषयी मोठी माहिती देणार असल्याची पोस्ट केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

फरहानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये डॉन या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हा पोस्टरवर त्याने 'उद्या चित्रपटासंबंधी मोठी बातमी शेअर करणार आहे' असे कॅप्शन दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल झाली असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. फरहान उद्या कसली घोषणा करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमात पोलिसांचा लाठीचार्ज ; नेमकं काय झालं? पाहा व्हायरल व्हिडीओ

‘डॉन ३’मध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नावाची सातत्याने चर्चा होत होती.मात्र, कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. या चित्रपटात शाहरुख खानसारख्या सुपरस्टारची जागा इतर कुणी घेऊ शकेल याचा विचारही कुणी केला नव्हता. मात्र, आता ‘डॉन ३’च्या टीझर रिलीजसह,रणवीर सिंह या चित्रपटात ‘डॉन’ची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले.

‘डॉन’मध्ये नवा चेहरा

१९७८मध्ये ‘डॉन’ हा चित्रपट पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर फरहान अख्तरने २००६ आणि २०११मध्ये शाहरुख खानला घेऊन ‘डॉन’चे २ सिक्वेल केले. आता फरहान अख्तर एक नवा चेहरा ‘डॉन’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

WhatsApp channel

विभाग