मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमात पोलिसांचा लाठीचार्ज ; नेमकं काय झालं? पाहा व्हायरल व्हिडीओ

Viral Video: मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमात पोलिसांचा लाठीचार्ज ; नेमकं काय झालं? पाहा व्हायरल व्हिडीओ

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2024 08:59 AM IST

Munawar Faruqui Mumbai Event: मुनव्वरला जवळून पाहण्यासाठी आणि त्याला स्पर्श करण्यासाठी चाहते इतके उत्सुक होते, की हा जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि धक्काबुक्की, चेंगराचेंगरी करू लागला होता.

Munawar Faruqui Mumbai Event
Munawar Faruqui Mumbai Event

Munawar Faruqui Mumbai Event: ‘बिग बॉस सीझन १७’ हा वादग्रस्त शो संपला असला तरी, यात सामील झालेले स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या शोचा विजेता मुनव्वर फारुकी हा देखील विविध कार्यक्रम आणि पार्ट्यांमुळे प्रसिद्धी झोतात असतो. बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याने नुकतीच ठाण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, त्याच्या या कार्यक्रमात चाहत्यांनी इतकी गर्दी केली, की तिथे चेंगराचेंगरी होऊ लागली होती. अखेर पोलिसांना मध्ये पडत या कार्यक्रमात लाठ्या-काठ्याही वापराव्या लागल्या. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पापाराझी व्हायरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकी मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचल्याचे दिसत आहे, तर, मुनव्वरने एन्ट्री करताच चाहत्यांनी त्याला अतिशय वाईटप्रकारे घेरले. मुनव्वरला जवळून पाहण्यासाठी आणि त्याला स्पर्श करण्यासाठी चाहते इतके उत्सुक होते, की हा जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि धक्काबुक्की, चेंगराचेंगरी करू लागला होता.

BAFTA Awards 2024: ‘बाफ्टा पुरस्कार २०२४’मध्ये कुणी मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी

पोलिसांनी केला लाठीचार्ज

जमावामधील ही चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की थांबवण्याचा मुंबई पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला. पण, तो यशस्वी झाला नाही. अखेर या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. कारमधून बाहेर पडल्यानंतर मुनव्वर फारुकीला स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या गर्दीतून वाट काढत तो स्टेजपर्यंत पोहोचू शकला. या कार्यक्रमादरम्यान अनेकांचे मोबाईलही चोरीला गेले.

मुनव्वर पडता पडता वाचला!

मुनव्वर फारुकीच्या या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी-शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. मुंब्रा ठाणे येथे हा कार्यक्रम पार पडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमादरम्यान स्टेजवर देखील काही लोकांची बाचाबाचीही झाली होती. कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा जवळचा मित्र सदाकत खान याच्याशीही धक्काबुक्की करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याआधीही कॉमेडियन मुनव्वर फारुकी चाहत्यांमुळे अडचणीत सापडला आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर जात असते. आधीच्या एका इव्हेंटमध्ये देखील असाच प्रकार घडला होता. यावेळी देखील इतकी धक्काबुक्की झाली की मुनव्वर फारुकी जवळजवळ खाली पडला. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

WhatsApp channel

विभाग