मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gaurav More: 'समीर चौगुले फक्त महाराष्ट्रात सुपाऱ्या घेतो पण मी...', गौरव मोरेचा व्हिडीओ चर्चेत

Gaurav More: 'समीर चौगुले फक्त महाराष्ट्रात सुपाऱ्या घेतो पण मी...', गौरव मोरेचा व्हिडीओ चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 10, 2022 12:02 PM IST

Maharashtrachi Hasyajatra: सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौरव मोरेचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा
महाराष्ट्राची हास्यजत्रा (HT)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' या कार्यक्रमातून अनेक स्पर्धक महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. या यादीमधील एक स्पर्धक म्हणजे गौरव मोरे. तो फिल्टरपाड्याचा बच्चन या नावाने ओळखला जातो. गौरवने त्याच्या विनोद बुद्धीने सर्वांची मने जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर गौरवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो समीर चौघुले विषयी बोलताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौरव मोरेचा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो समीर चौघुले विषयी बोलताना दिसत आहे. व्हिडीओमधील त्याचा “समीर चौगुले फक्त महाराष्ट्रात सुपाऱ्या मारतो मी लंडन रिटर्न आहे” डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गौरवचा हा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वाचा: आलिया भट्टचा मुलीसोबतचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ व्हायरल? काय आहे सत्य?

काही दिवसांपूर्वी गौरव हा लंडनला गेला होता. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला त्याने भेट दिली होती. या भेटीचे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्याने, 'भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.. आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना, कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे.. या भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना... तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे. आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा' असे कॅप्शन दिले होते.

कामाविषयी बोलायचे झाले तर गौरव 'हवाहवाई' या चित्रपटात झळकला होता. त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर आता लवकरच एक नवा कोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत भरत जाधव, निखिल चव्हाण आणि माधुरी पवार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

IPL_Entry_Point