
बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट नुकताच आई झाली आहे. तिने ६ नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. चिमुकलीच्या येण्याने कपूर कुटुंबीय आनंदी झाले आहेत. आता चाहते आलियाच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. अशातच सोशल मीडियावर आलियाचा मुलीसोबतचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण ती खरच आलिया आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सध्या सोशल मीडियावर आलियाचे मुलीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली ही रणबीर आणि आलियाची मुलगी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. पण हे फोटो फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कपूर कुटुंबीय किंवा भट्ट कुटुंबीयांनी रणबीर-आलियाच्या मुलीचा एकही फोटो शेअर केलेला नाही.
वाचा: लेकीला पाहाताच रणबीरला अश्रू अनावर
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो फोटोशॉप करुन तयार करण्यात आला आहे. या फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलमधील बेड मुलीसोबत झोपली असल्याचे दिसत आहे. शिवाय एका व्हिडीओमध्ये आलियाच्या मुलीचा चेहरा दाखवण्यात आला होता आणि मुलगी आलियाची आहे असे सांगण्यात आले होते. पण हे व्हिडीओ आणि फोटो फेक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
रविवारी सकाळी रणबीर कपूर आलियासोबत एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. एचएन रिलायन्स फाउंडेशन हे तेच हॉस्पिटल आहे, जिथे ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. याच हॉस्पिटलमध्ये आलिया आणि रणबीरच्या लेकीचा जन्म झाला आहे. याआधी आलिया नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला बाळाला जन्म देईल, असे बोलले जात होते. परंतु, नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच कपूर कुटुंबात ‘राजकन्ये’चे आगमन झाले आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी या वर्षीच 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच या जोडीने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर करत बाळाच्या आगमनाची घोषणा केली होती.
संबंधित बातम्या
