मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Christina Ashten: किम कार्दाशियन बनण्याच्या मोहात मॉडेलने केली प्लास्टिक सर्जरी; गमावला जीव!

Christina Ashten: किम कार्दाशियन बनण्याच्या मोहात मॉडेलने केली प्लास्टिक सर्जरी; गमावला जीव!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 28, 2023 10:15 AM IST

Kim kardashian look a like Christina Ashten Death: किम कार्दाशियनसारखी दिसणारी क्रिस्टीना अॅश्टन खूपच चर्चेत होती. मात्र, आता एक सर्जरीनंतर तिला आपला जीव गमवावा लागला आहे.

Christina Ashten Gourkani
Christina Ashten Gourkani

Kim kardashian look a like Christina Ashten Death: मॉडेल-अभिनेत्री किम कार्दाशियन हे मनोरंजन विश्वातील एक मोठे नाव आहे. किमला ओळखत नाही अशी क्वचित एखादी व्यक्ती असेल. जगभरात तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. इतकेच नाही तर, किम कार्दाशियन प्रमाणे दिसावे म्हणून अनेक तरुणी स्वतःवर सर्जरी करून घेताना दिसतात. मॉडेलिंग क्षेत्रातही अनेक मॉडेल्सनी अशा शस्त्रक्रिया करून घेतल्याचे ऐकिवात असेल. अशा मॉडेल्सपैकी एक नाव आहे क्रिस्टीना अॅश्टन. किम कार्दाशियनसारखी दिसणारी क्रिस्टीना अॅश्टन खूपच चर्चेत होती. मात्र, आता एक सर्जरीनंतर तिला आपला जीव गमवावा लागला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मॉडेल क्रिस्टीना अॅश्टन हिचे वयाच्या ३४व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. क्रिस्टीना किमसारखी दिसण्यासाठी आणि बॉडी फिगरसाठी ओळखली जात होती. हळूहळू ती प्रचंड लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर तिचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्गही होता. मात्र, वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. २६ एप्रिल रोजी क्रिस्टीना अॅश्टनच्या निधनाची दु:खद बातमी तिच्या कुटुंबियांनी शेअर केली.

Ponniyin Selvan 2: ‘नंदिनी’च्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय नव्हे ‘या’ अभिनेत्रीच्या नावाला होती पहिली पसंती!

तिच्या निधनाचे वृत्त ऐकून तिचे चाहते खूप निराश झाले आहेत. प्लास्टिक सर्जरीच्या प्रक्रियेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. क्रिस्टीना अॅश्टनवर प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर तिला कार्डियाक अरेस्ट आला. या दरम्यानच तिचा मृत्यू झाला आहे. क्रिस्टीनाने किम कार्दाशियन प्रमाणे दिसण्यासाठी स्वतःवर अनेक सर्जरी करवून घेतल्या होत्या. मात्र, अशाच एका सर्जरी दरम्यान तिला आपला जीव गमवावा लागला आहे.

क्रिस्टीना अॅश्टनच्या कुटुंबीयांनी देखील पुष्टी केली आहे की, क्रिस्टीनाची ही स्थिती वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान झाली आणि ती सतत वाढतच गेली. या सोबतच तिच्या मृत्यूची चौकशी देखी; सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे तिचे चाहतेही दु:खी झाले आहेत. एका व्यक्तीने लिहिले, 'तू खूप सुंदर होतीस, देव तुझ्या आत्म्याला शांती देवो.' दुसर्‍या व्यक्तीने लिहिले, 'ती खूप छान होती, अगदी देवदूतासारखी... तुझ्या आत्म्याला शांती लाभो.' अनेक चाहते तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग