मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sharman Joshi Birthday: बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांमुळे शर्मन जोशीच्या कारकिर्दीला मिळाली कलाटणी! तुम्ही पाहिलेयत का?

Sharman Joshi Birthday: बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांमुळे शर्मन जोशीच्या कारकिर्दीला मिळाली कलाटणी! तुम्ही पाहिलेयत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 28, 2023 08:32 AM IST

Happy Birthday Sharman Joshi: शर्मन जोशीने अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. परंतु, त्यानंतर त्याने सहाय्यक भूमिकांमध्येच आपले नशीब आजमावले.

Sharman Joshi
Sharman Joshi

Happy Birthday Sharman Joshi: बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी आज (२८ एप्रिल) आपला वाढदिवस साजरा करत आहे. शर्मन जोशी याने १९९९मध्ये आलेल्या 'गॉडमदर' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाद्वारे त्याने अभिनय विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले. पण, त्याला हवी ती ओळख मिळवता आली नाही. यानंतर शर्मन जोशीला 'एक्सक्यूज मी' हा चित्रपट मिळाला आणि हा चित्रपट अभिनेत्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटानंतर शर्मन जोशीने अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. परंतु, त्यानंतर त्याने सहाय्यक भूमिकांमध्येच आपले नशीब आजमावले. चला जाणून घेऊया त्याच्या अशाच काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल...

ट्रेंडिंग न्यूज

एक्सक्यूज मी

शर्मन जोशीचा 'एक्सक्यूज मी' हा चित्रपट २००३ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता शर्मन जोशीसोबत साहिल खान, सोनाली जोशी आणि जया सील असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

रंग दे बसंती

आमिर खानच्या 'रंग दे बसंती'मध्ये शर्मन जोशीने साकारलेली व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातील त्याचा दमदार अभिनय सगळ्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले होते.

Medha Manjrekar Birthday: सेटवर आलेल्या मेधा यांना पाहताच प्रेमात पडले होते महेश मांजरेकर! ‘अशी’ होती क्युट लव्हस्टोरी..

लाईफ इन अ मेट्रो

'लाईफ इन अ मेट्रो' या चित्रपटामध्ये शर्मन जोशीचा अभिनय जबरदस्त होता. या चित्रपटातील अभिनेत्याची साधी आणि वेगळी शैली चाहत्यांना खूप आवडली होती. ‘लाईफ इन अ मेट्रो’ या चित्रपटात शर्मन जोशी याच्यासोबत शिल्पा शेट्टी, कंगना रनौत, इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, केके मेनन असे अनेक दिग्गज कलाकार झळकले होते.

गोलमाल

'रंग दे बसंती' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर शर्मन जोशी रोहित शेट्टीच्या 'गोलमाल'मध्ये झळकला होता. या चित्रपटातील त्याच्या लक्ष्मणच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती.

३ इडियट्स

शर्मन जोशीचा '३ इडियट्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. चित्रपटात शर्मन जोशीने ‘राजू रस्तोगी’ची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटात शर्मन जोशीसोबत आमिर खान आणि आर माधवन देखील झळकले होते.

IPL_Entry_Point

विभाग